आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोध्रा कांडचा आणखी एक आरोपी अटकेत, १३ वर्षांपासून होता फरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गोध्रा कांड प्रकरणात १३ वर्षांपासून फरार आरोपी कासम इब्राहिम भमेडी(५३) अहमदाबाद एटीएसने सोमवारी दाहोद रेल्वे स्थानकात अटक केली. साबरमती रेल्वेच्या डबा क्रमांक एस-६ आग लावल्या प्रकरणात पोलिसांना तो हवा होता. या पंधरवड्यातील ही तिसरी अटक आहे. काही दिवसांपूर्वी एटीएसने झाबुआ येथून हुसेन सुलेमान शेखला पकडले होते. गोध्रा कांडात ८२ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यात आतापर्यंत ७० जणांना अटक झाली असून १२ फरार आहेत.

आरोपी कासम जमातचा घटक बनून वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. आरोपी दतियामध्ये (मध्य प्रदेश) गेल्याचे पोलिसांना कळाले. यानंतर मध्य प्रदेशातून आलेल्या एका रेल्वेतून सोमवारी त्याला ताब्यात घेतले.

एटीएस अधिकारी आर. आर. सरवैया म्हणाले, की गोध्रा कांड प्रकरणात कासम भमेडीसह ७० जणांविरुद्ध खटला दाखल आहे. हे प्रकरण गोध्रा रेल्वे पोलिस ठाण्यात जीआरपी अधिनियमान्वये दाखल झाले होते.