आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये शिक्षक रागावल्याने मयूर पाटीलची आत्महत्या, 2 दिवसांतील दुसरी घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- मयूर पाटील आणि त्याची बहिण.)
सूरत (गुजरात)- शिक्षकांनी तक्रार केल्यानंतर वडील जोरदार रागावल्याने 12 व्या वर्गात शिकत असलेल्या मयूर पाटील या विद्यार्थ्याने काल आत्महत्या केली. पाटील कुटुंबीय मुळचे जळगावचे असून नोकरीनिमित्त सूरत येथे राहतात.
मयूरचे वडील मनोहरभाई पोलिस विभागात आहेत तर आई आणि बहिण शिक्षिका आहेत. मयूर अभ्यासात थोडा कच्चा होता. शिक्षक त्याला दररोज रागवत असत. काही दिवसांपूर्वी त्याच्या शिक्षकाने त्याच्या वडीलांना शाळेत बोलवले होते. त्यामुळे मयूरचे वडील मंगळवारी शाळेत गेले होते. मयूरच्या अभ्यासासंदर्भात शिक्षकांनी वडीलांना माहिती दिली. घरी आल्यावर मनोहरभाई यांनी मयूरला जोरदार दटावले. त्यानंतर ते नोकरीवर गेले. आईही नोकरीवर असल्याने तिही घराबाहेर गेली. घरी कुणीच नव्हते.
वडीलांनी रागवल्याने मयूर नैराश्येत गेला होता. त्याने बेडरुममध्ये जाऊन गळफास घेतला. सिलिंगफॅनला लटकलेला त्याचा मृतदेह आढळून आला.
या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. पाटील कुटुंबीयांचे नातलग आणि शेजारी त्यांच्या घरी जमा झाले.
सोमवारी आठवीच्या मुलाने केली होती आत्महत्या
या घटनेच्या ठिक एका दिवसापूर्वी आरटीओ ऑफिससमोर राहत असलेल्या एका शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिक्षकांनी मारहाण केल्याने त्याने आत्महत्या केली होती.
पुढील स्लाईडवर बघा मयूरचा कुटुंबीयांसह फोटो....