आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूरतमध्‍ये ओव्हर ब्रीज पडल्याने 12 जणांचा मृत्यू, पाहा घटनेची विदारक छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत - शहरातील आठवालाईन्स क्षेत्रात मंगळवारी बांधण्‍यात येत असलेल्या ओव्हरब्रीजचा भाग 12 कामगारांवर पडल्याने त्यात त्यांचा अंत झाला, तर चार जण जखमी आहेत.
हा अपघात ब्रीजचा आधार काढताना झाला. मृतांमध्‍ये 5 कामगार ही झारखंडमधील होती. इतर ही झारखंड, मध्‍यप्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील असल्याचे बोलले जात आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्‍यात आले आहेत. महानगरपालिका जखमींना 50 हजार, खूप गंभीर असलेल्यांना 1 लाख, तर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1लाख रूपयांची मदत घोषित केली आहे. बांधकामाच्या ढिगा-याखाली अडकलेला कामगार मृत्यूशी दहा तासांपर्यत लढत होता.त्यात तो यशस्वी झाला. मात्र यात त्याचा एक पाय पूर्णपणे कामातून गेला. बचाव कार्य करत असताना संबंधित कामगाराचा आवाज बचाव टीमला आल्याने त्याला ढिगा-यातून सुखरूप काढण्‍यात आले.

दुपारचे एक वाजेपर्यंत बचाव पथकाला 10 कामगारांना बाहेर काढण्‍यात यश आले होते. जखमींना स‍िव्हिल हॉस्पीटलमध्‍ये पाठवण्‍यात आले, तर चार जणांना उपचारापूर्वी जगाचा निरोप घेतला.

घटनास्थळाची छायाचित्रे पाहाण्‍यासाठी पुढील स्लाइड्वर क्लिक करा.....