आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद - पाटीदार आरक्षण आंदोलन समिती (पास) ने शुक्रवारी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसला 24 तासांच्या आता आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी सांगितले आहे. पासने म्हटले की, जर काँग्रेसने आमची मागणी मान्य केली नाही, तर त्यांचे भाजपसारखे हाल होऊ शकतात. काँग्रेसनेही भाजपप्रमाणे विरोध दर्शवला आहे. एवढेच नाही, काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या पाटीदार उमेदवारांनाही बायकॉट केले जाईल. काँग्रेसने हार्दिक पटेल गटाच्या 5 पैकी 4 मागण्या मान्य केल्या होत्या. आरक्षणावर कोणतेही ठोस आश्वासन दिले नव्हते.
पाटीदारांचा काँग्रेसला इशारा
शुक्रवारी सुरतमध्ये "पास"चे संयोजक धार्मिक मालवियांनी काँग्रेसला हा इशारा दिला. ते म्हणाले- ज्या तऱ्हेने भाजप उमेदवारांना पाटीदारांच्या परिसरात प्रवेश देण्यात येत नाहीये, बिलकुल तशीच वेळ आम्ही काँग्रेस उमेदवारांवरही आणू शकतो."
- काँग्रेस आम्हाला भाजपसारखा लॉलीपॉप देऊ शकत नाही. त्यांना आमच्या अल्टिमेटमवर आपले मत स्पष्ट करावे लागेल.
पाटीदार समाज जिंकवू शकतो आणि पराभूतही करू शकतो
- धार्मिक मालविया म्हणाले- पाटीदार समाज आपल्या बळावर निवडणुकीत कोणत्याही पक्षाची जय-पराजय ठरवू शकतो. अशा स्थितीत आम्ही आम आदमी पक्ष, शिवसेना किंवा राष्ट्रवादीला आमचा पाठिंबा देऊ शकतो.
- जर एखाद्या राजकीय पक्षाचे समर्थन केले नाही तरी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करू, त्यांच्या विजयासाठी पाटीदार समाजाचे मते पुरेशी आहेत.
- तथापि, 18 नोव्हेंबरपासून पास पाटीदारांच्या परिसरात डोअर टू डोअर जाऊन भाजपविरोधात अभियान चालवणार आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.