आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Painter Jerambhai Patel News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रकार जेराम यांनी दिली सेवकाला १ कोटींची भेट, दातृत्वाने सेवकाचे नशीब फळफळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडोदरा - कुंचला केवळ कॅन्व्हासमध्येच रंग भरतो असे नाही, तर तो लोकांचे आयुष्यही सप्तरंगांनी फुलवू शकतो. गुजरातमधील प्रसिद्ध चित्रकार जेरामभाई पटेल यांनी हे त्यांच्या अनोख्या दातृत्वातून दाखवून दिले आहे. जेरामभाई पटेल यांच्याकडे अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करणा-या डाया भाई या सेवकाच्या खात्यावर जेराम यांनी नुकतेच एक कोटी रुपये जमा केले आहेत. दिल्लीतील किरण नादर म्युझियम ऑफ आर्टने जेराम पटेल यांच्या २५० पेंटिंग्ज नुकत्याच सांभाळण्यासाठी घेतल्या. त्या बदल्यात त्यांनी जेराम यांना दोन कोटी रुपये दिले.
अर्थात, जेरामभाईंना त्यांच्या आयुष्यभर केलेल्या परिश्रमासाठी दिल्या गेलेल्या बिदागीचा तो पहिला हप्ता होता.
म्युझियमने त्यांच्यासोबत एकूण सहा कोटी रुपये देण्यासाठी करार केला आहे. जेरामभाईंनी आजवर काढलेले एकदेखील चित्र बाजारात विकले नाही. त्यांनी त्यांच्या सर्व कलाकृती जतन करून ठेवल्या. त्यात त्यांचा नोकर डायाभाईचा वाटा होता. जेराम यांनी म्युझियमला चित्रे देतानाही ते त्याची विक्री करणार नाहीत, तर केवळ प्रदर्शनी भरवतील या अटीवरच त्यांच्याकडे सर्व कलाकृतींचा ठेवा सोपवला. जेराम यांच्या चित्रकृतींचे पहिले प्रदर्शन २०१५ मध्ये प्रस्तावित आहे. चित्रकलेतील योगदानासाठी जेराम यांना पाच वेळा ललित कला अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

मॉडेल ते सेवक आणि आता कोट्यधीश : डायाभाई जेव्हा पहिल्यांदा जेराम यांना भेटले तेव्हा ते केवळ १२ वर्षांचे होते. त्या वेळी ते मॉडेल म्हणून एमएस विद्यापीठात फाइन आर्ट विभागात जात असत. पेंटिंग्जमध्ये त्या वेळी त्यांचा डमी म्हणून वापर होत असे. या काळात त्यांची जेरामभाईंसोबत ओळख वाढली व भेटीही वाढत गेल्या. त्यातून ते त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग बनले. गेल्या ४० वर्षांपासून ते जेरामभाईंची सेवा करत आहेत. आता जेरामभभाई
हिंडूफ‍िरू शकत नाहीत. या परिस्थितीत डायाभाईच त्यांना आधार देत आहेत. मिळालेल्या पैशाचा उपयोग डायाभाई मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहेत.