आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Denies Link To Blast In Boat In Arabian Sea Near Porbander

नौकेत स्फोट होताच दोन दहशतवाद्यांनी समुद्रात घेतल्या होत्या उड्या; पाकिस्ताने वृत्त फेटाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: स्फोट होण्यापूर्वी कोस्ट गार्डच्या एअरक्राफ्टवरून घेतलेले नौकेचे छायाचित्र)

पोरबंदर- कराचीहून भारताच्या दिशेने एकही नौका गेली नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. अरबी समुद्रात गेल्या 31 डिसेंबरला संशयीत नौकेत झालेल्या स्फोटाबाबत पाकिस्तान सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.
पोरबंदरपासून 365 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात पाकिस्तानकडून आलेल्या एका नौकेत स्फोट झाला. त्यावर चार संशयीत होते. त्यापेकी दोघांनी लाइफ जॅकेट परिधान करून समुद्रात उड्या घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, दोघांच्या स्फोटात मृत्यु झाल्याची माहिती कोस्ट गार्डचे आयजी कुलदीप सिंह शेवरान यांनी आज (शनिवारी) पत्रकारांना दिली. नौकेत बसलेल्या चौघांची जीन्स आणि टी शर्ट परिधान केले होते. यावरून ते मच्छीमार नसल्याचे स्पष्ट होते. दोघांचा शोध घेण्याची काम सुरु आहे.
कुलदीप सिंह शेवरान यांनी सांगितले की, गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर लक्ष ठेवले जात आहे. यासाठी सात एअरक्राफ्ट पाठवण्यात आले आहे. स्फोट झाल्यानंतर नौकेला जलसमाधी मिळाली होती. नौकेचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
कुलदीप सिंह यांनी सांगितले की, नौकेत बसलेल्या चौकांनी काही काळासाठी लाइट लावला होता. तेव्हा जवानांनी चौघांना पाहिले होते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून प्रत्युत्तर मिळाले नाही. नंतर त्यांचा पाठलाग करण्यात आला. कोस्ट गार्डच्या जवानांनी नौकेला चारही बाजुंनी घेरले तेव्हा, नौकेत स्फोट झाला. नौकेत मोठ्याप्रमाणात स्फोटके होते.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, कोस्ट गार्डच्या ऑपरेशनवर उपस्थित झाले प्रश्नचिन्ह...