आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Hacker Hack Gujarat Government's Website

पाकिस्तानी हॅकर्सनी गुजरात सरकारच्या वेबसाइटला हॅक केले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - पाकिस्तानी हॅकर्सनी पुन्हा एकदा भारतीय सायबर क्षेत्रात घुसखोरी करुन साइट हॅक केली आहे. या वेळी पाक हॅकर्सचा फटका गुजरात सरकारच्या वेबसाइटला बसला आहे. आपण पाकिस्तानी सायबर माफिया आहोत, असे सांगणा-या हॅकर्सनी गुजरात सरकारच्या दोन तसेच इतर तीन वेबसाइट हॅक करून पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यावर आक्षेपार्ह मजकूर व कॉमेंट टाकल्या आहेत.
गुजरात सरकारच्या हायर एज्युकेशन कमिशनरेट व अ‍ॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कमेटीची साइट त्यांनी हॅक केली. याची माहिती फेसबुक पेजवर टाकून त्यावर ‘फील द पॉवर ऑफ पाकिस्तान’, ‘पाकिस्तान झिंदाबाद’, असा मजकूर टाकला.
याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.