आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये आज येथे वाहणार शुद्ध तुपाच्या नद्या, वरदानी माताजीची कृपा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगरः रूपाल भागात अनेक अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे आज (शुक्रवार) आसो सुद नोमच्या दिवशी माताजी चे पल्ली उत्सव साजरा केले जाते. मल्ली उत्सवाच्या सर्व तयारी झाली आहे. या उत्सवात सहभाग घेण्यासाठी गुजरातच्या कान्या कोपर्‍यातून आज माताजींच्या दर्शनासाठी जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त भक्त रुपालला आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्र येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
माताजींच्या बहूमुल्य अलंकारांच्या संरक्षणासाठी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच लाखो भक्त आज माताजींना शुद्ध तुपाने अभिषेक घालणार आहे, त्यावेळी शहरातील नदी नाल्यांमध्ये तुपाच्या नद्या वाहायला लागतील. आपले नवस पुर्ण झाल्यामुळे भक्त माताजींचे दर्सन घेण्यासाठी रुपालला येतात आणि शुद्ध तुपाने वरदान प्राप्त माताजींचे अभिषेक करतात.