आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिकचा फोन: अपहरण करून रात्री फिरवले, जीवे मारण्‍याची दिली धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरेंद्रनगर जिल्‍ह्यातील बायड तालुक्‍यात मंगळवारी पोलिसांना पाहून आंदोलकांनी असा पळ काढला. - Divya Marathi
सुरेंद्रनगर जिल्‍ह्यातील बायड तालुक्‍यात मंगळवारी पोलिसांना पाहून आंदोलकांनी असा पळ काढला.
अहमदाबाद- 'आपण आंदोलनातून पळ काढला नाही, तर आपले अपहरण करण्‍यात आले.' अशी माहिती हार्दिक पटेल यांनी त्‍यांच्‍या मित्रांना फोन करून दिली आहे. गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेते पटेल मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेपासून बेपत्ता होते. त्‍यांनी फोनव्दारे मित्रांना माहिती दिली, ते रॅलीतून स्‍वत: पळाले नाहीत, अपहरणकर्त्‍यांनी रात्रभर त्‍यांना कारमध्‍ये फिरवले. बुधवारी सकाळी धांगथ्रा महामार्गावर सोडून दिले व अपहरणकर्ते फरार झाले, असे पटेल यांनी सांगितले.
बुधवारी दुपारी केला फोन
सुरेंद्रनगर जिल्‍ह्यात राहणा-या हार्दिक यांच्‍या मित्रांनी सांगितले की, बुधवारी दुपारी हार्दिक यांनी त्‍यांना फोन केला व माहिती दिली. त्‍यानुसार धांगथ्रा महामार्गावर काही मित्रांसोबत हार्दिक पटेल आहेत. मंगळवारी अपहरण करून त्‍यांना स्‍विफ्ट कारमध्‍ये रात्रभर फिरवण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
पुढील स्‍लाईड्सवर वाचा, पटेल यांना जीवे मारण्‍याची धमकी..