आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Patel Of Gujarat Not To Welcome Modi In Usa Visit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरक्षणावरील PM च्या चुप्पीने नाराज, USA मध्ये गुजराती पटेल नाही करणार मोदी-मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या लोकांच्या स्वागताचा स्विकार करताना पंतप्रधान मोदी. - Divya Marathi
गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या लोकांच्या स्वागताचा स्विकार करताना पंतप्रधान मोदी.
अहमदाबाद - गुजरातमध्ये आरक्षणाची मागणी करणारा पटेल समाज पंतप्रधानांच्या चुप्पीने नाराज आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या या महिन्यातील अमेरिका दौऱ्यावर गुजराती पटेल समाजाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील न्यूजर्सी मध्ये पटेल समाजाची मंगळवारी बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. 24 ते 30 सप्टेंबर दरम्यान पंतप्रधानांचा अमेरिका दौरा असणार आहे.

आंदोलनाशी संबंधीत नेते काय म्हणाले ?
पटेल आंदोलनाशी संबंधीत सरदार पटेल ग्रुपचे अध्यक्ष लालजी पटेल म्हणाले, 'गुजरातमध्ये पटेल समाजाने आरक्षणासाठी एवढे मोठे आंदोलन केले आहे. त्यावर पंतप्रधानांनी अद्याप अवाक्षर काढलेले नाही. त्यांच्या या मौनामुळे अमेरिकेतील आमच्या समाजाने हा निर्णय घेतला आहे. त्यांचे इतर देशातील दौऱ्यांदरम्यानही हाच पवित्रा घेण्यात येईल. त्यासोबतच राज्य सरकारच्या कार्यक्रमांनाही समाज विरोध करेल.' अमेरिकेमध्ये पटेल समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. एका रिपोर्टनूसार 1.45 लाख गुजराती पटेल अमेरिकेत स्थायिक आहे. पंतप्रधान या महिन्यात कॅलिफोर्निया येथे जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर न्यूजर्सीमधील अॅडिसन येथे जवळपास एक हजार पटेलांची या मुद्यावर बैठक झाली.
काय परिणाम होईल ?
पंतप्रधान गेल्या 14 महिन्यात ज्या ज्या देशात गेले तेथील भारतीय वंशाच्या लोकांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले होते. विदेशांमध्ये विशेषतः अमेरिकेत गुजराती पाटीदार पटेल समाज मोठ्या प्रमाणात आहे. यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला तर गेल्या वर्षभरातील विदेशातील कार्यक्रमात जो उत्साह पाहायला मिळाला होता तो यापुढे राहाणार नाही. पंतप्रधानांनी आतापर्यंत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडासह अनेक देशांचा दौरा केला आहे. या दरम्यान पटेल समाज मोठ्या संख्येने त्यांच्या सभांना उपस्थित होता.