आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Home Minister Rajni Patel's Property Set On Fire In Mehsana

गृहराज्यमंत्री पटेलांच्या घराला लावली आग, पाटीदारांचे आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहसाणा - गुजरातमध्ये सोमवारी पाटीदारांच्या राज्यव्यापी बंदच्या दरम्यान संतप्त आंदोलकांनी गृहराज्यमंत्री रजनीकांत पटेल यांच्या मेहसाणामधील घराला आग लावली. ऑगस्ट २०१५ मध्येही आंदोलकांनी त्यांच्या घरी तोडफोड करून आग लावली होती. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक जिल्ह्यांत इंटरनेट सेवेवर बंदी होती. मेहसाणा, सुरतसह सौराष्ट्राच्या काही भागांत बंदचा परिणाम जाणवला. उत्तर गुजरातच्या काही भागांत किरकोळ संघर्ष झाल्याचे वृत्त आहे.

अहमदाबादमध्ये बंदचा विशेष परिणाम झाला नाही. पाटीदारबहुल भागांत पोलिसांची गस्त मात्र सुरूच होती. रविवारी जेल भरो आंदोलनादरम्यान दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांप्रकरणी पोलिसांनी लालजी पटेल यांच्यासह ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरतमध्ये पोलिसांनी २४०० पाटीदारांच्या विरोधात पाच गुन्हे दाखल केले आहेत. ६६ जणांना अटक करण्यात आले आहे. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यापैकी ३९ आरोपींना जामीन मिळाला नाही. त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
हार्दिकच्या सुटकेसाठी दिल्लीकडे नजर
पाटीदारांचा नेता हार्दिक याच्या सुटकेसाठी तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर गुजरात सरकारचे डोळे आता दिल्लीकडे लागले आहेत. सोमवारी मंत्र्यांची समिती आणि पाटीदार समाजाच्या २० नेत्यांच्या बैठकीनंतर हे संकेत मिळाले. मंत्री समितीचे अध्यक्ष नितीन पटेल म्हणाले की, हार्दिक पटेलने आपल्या २७ मागण्यांचे जे निवेदन दिले आहे त्याक पाटीदारांना ओबीसीचे नव्हे तर आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे वक्तव्य म्हणजे पाटीदारांसह सवर्णांना आर्थिक आधारावर आरक्षण देण्याच्या सरकारच्या तयारीचे संकेत अशा स्वरूपात पाहिले जात आहे. अर्थात निर्णयाची घोषणा दिल्लीतील पक्षश्रेष्ठींवर सोडण्यात आली आहे.