आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patel Youth Commits Suicide In Support Of Reservation

पेटल युवकाची आरक्षणासाठी आत्महत्या, 'आम्ही गुजरातचे सुपुत्र नाही का ?'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमेश पटेलचा मृतदेह - Divya Marathi
उमेश पटेलचा मृतदेह
अहमदाबाद - गुजरातमध्ये ओबीसी आरक्षणासाठी एका पाटीदार पटेल समाजाच्या युवकाने आत्महत्या केली आहे. शनिवारी राजकोट येथील उमेश पटेल याने आत्महत्येपूर्वी चार पत्र लिहून ठेवले. त्यातील एका पत्रात त्याने लिहिले आहे, 'माझ्याकडे जमीन आहे ना घर. आरक्षणाची मागणी केली तर लाठ्या खाव्या लागत आहेत. मी गुजरातचा सुपुत्र नाही का? माझ्या आई-वडीलांचा मी एकुलता एक मुलगा आहे. माझ्यासारखे अनेक पाटीदार बंधु-भगिणी आहेत. आता माझ्या नंतर माझ्या आई-वडीलांचा सहारा कोणी नाही.'
प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला एक मुलगा भेटेल
उमेश पटेलने आई-वडील, मित्र, पत्नी आणि समाजाच्या नावाने वेगवेगळी चार पत्रे लिहिली आहे. समाजाच्या नावाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, 'माझे बलिदान वाया जावू देऊ नका. सरकारने ठोस पाऊल उचलेल नाही तर प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला त्यांना असाच एक मुलगा भेटत राहील. माझ्या सर्व शहीद बांधवांचे बलिदान लक्षात ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहा.' दुसरीकडे पाटीदार पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी राज्यातील पाटीदारांना आवाहन केले, की आंदोलना दरम्यान शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मेणबत्ती हातात घेऊन आंदोलन करा.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, उमेश पटेलने व्हॉट्सअॅपवर पाठवला शेवटचा संदेश