आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये पाटीदारांचे केजरीवालांविरोधात आंदोलन, 'पाकिस्तान जाओ'च्या दिल्या घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातमधील सभेत उपस्थितांना अभिवादन करतांना केजीरवाल. - Divya Marathi
गुजरातमधील सभेत उपस्थितांना अभिवादन करतांना केजीरवाल.
सूरत / अहमदाबाद - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुजरातमधील सभेच्याआधी विरोधी घोषणाबाजीला सामोरे जावे लागले. काहींनी त्यांना काळे झेंडेही दाखवले. उरी हल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकवर केजरीवालांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावरुन गुजरातमध्ये केजरीवालांना विरोध झाला. 'केजरीवाल पाकिस्तान जाओ'च्या घोषणाही विरोधकांनी दिल्या. पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल यांच्या आंदोलनातील एक माजी नेता केजरीवालांविरोधात रस्त्यावर उतरला आहे.
कोण करत आहे केजरींना विरोध
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या 20 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- विरोधाची ही घटना पाटीदार बहुल वाराछा येथील योगीचौक येथे घडली आहे.
- यावेळी हार्दिक पटेलचा जुना साथीदार निखिल सवाणी आणि कार्यकर्त्यांनी केजीरांना काळे झेंडे दाखवले.
- केजरीवालांनी लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित केल्याने कार्यकर्ते नाराज होते.
- केजरीवाल यांचा गुजरात दौरा 14 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे, तेव्हापासून त्यांना विविध ठिकाणी विरोधाचा सामना करावा लागत आहे. कुठे पोस्टर तर, कुठे काळे झेंडे घेऊन लोक त्यांना देशविरोधी आणि पाकिस्तानी दहशतवादीही म्हणत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पाकिस्तानी हिरोंचे पोस्टर...
बातम्या आणखी आहेत...