आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटीदार आंदोलनामुळे आज गुजरात बंद: महेसाणामध्‍ये संचारबंदी, काय म्‍हणाल्‍या CM

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारच्‍या तणावामुळे ही महिला मुलासोबत सूरतच्‍या वराछा भागात अडकली होती. आता घरी कसे पोहोचावे हा एकच प्रश्‍न या मायलेकांच्‍या डोळ्यात होता. - Divya Marathi
रविवारच्‍या तणावामुळे ही महिला मुलासोबत सूरतच्‍या वराछा भागात अडकली होती. आता घरी कसे पोहोचावे हा एकच प्रश्‍न या मायलेकांच्‍या डोळ्यात होता.
महेसाणा- गुजरातमध्‍ये पाटीदार समाजबांधवांनी आरक्षणासाठी पुकारलेल्‍या आंदोलनाने पुन्‍हा एकदा हिंसक रूप धारण केले आहे. रविवारी ‘जेल भरो आंदोलन’ करताना पाटीदार समाजाचे हजारो लोक महेसाणामध्‍ये एकत्र आले. आंदोलक आणि पोलिस समोरा-समोर आले. आंदोलकांनी दगडफेक केली. त्‍यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला. यामध्‍ये सरदार पटेल ग्रुपचे (एसपीजी) अध्‍यक्ष लालजी पटेल जखमी झाले. त्‍यानंतर सोमवारी गुजरात बंदची हाक देण्‍यात आली. दरम्‍यान, मुख्‍यमंत्री आनंदीबेन पटेल म्‍हणाल्‍या की, असे आंदोलने तर होतच राहतात. महेसाणामध्‍ये संचारबंदी, मोबाइल-इंटरनेट बंद...
- आनंदीबेन म्‍हणाल्‍या, ‘असे आंदोलनं होतच राहतात, ते होऊद्या. शासनाचे काम सेवा पुरवणे आहे. '
- दरम्‍यान, महेसाणा सूरत, अहमदाबाद आणि राजकोटमध्‍ये पुन्‍हा आंदोलन पेटले आहे.
- पाटीदार समाजबांधवांनी राज्‍यात कित्‍येक ठिकाणी सार्वजनिक बस पेटवल्‍या आहेत.
रविवारी काय झाले....
- लालजी पटेल जखमी झाल्‍यानंतर महेसाणामध्‍ये हिंसक वातावरण पेटले.
- पाहता पाहता शहरातील बाजारपेठा बंद झाल्‍या, तणाव वाढत गेला.
- हार्दिकनंतर लालजी पटेल या आंदोलनाचे नेतृत्‍व करत होते.
- तणावावर नियंत्रण मिळवण्‍यासाठी आजुबाजुच्‍या परिसरातून पोलिसांना बोलावण्‍यात आले.
- शहरात संचारबंदी लागू केल्‍यानंतर मोबाइल-इंटरनेट सेवाही बंद करण्‍यात आली.
- या आंदोलनाचा प्रमुख हार्दिक विरोधात राजद्रोहाचा खटला सुरू आहे.
- मागील आठ महिन्‍यांपासून हार्दिक तुरुंगात आहे.
मंत्र्याच्‍या कार्यालयावर हल्‍ला....
- महेसाणामध्‍ये गुजरातचे मंत्री नितिन पटेल यांच्‍या कार्यालयावरही हल्‍ला झाला आहे.
- गुजरात सरकारचे प्रवक्‍ते नितिन पटेल यांनी पाटीदारांना शांततेसाठी आवाहन केले.
राजनाथ यांनी केला आनंदीबेन यांना फोन....
- गुजरातच्‍या सीएम आनंदीबेन यांनी महेसाणामधील तणावाची गृहमंत्री राजनाथ सिंह यांना माहिती दिली.
- राजनाथ सिंह यांनी ट्विट करून सांगितले की, यासंदर्भात गुजरातच्‍या सीएमसोबत चर्चा झाली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर फोटोंमध्‍ये पाहा, पुन्‍हा पेटले पाटीदार समाजाचे आंदोलन....
बातम्या आणखी आहेत...