आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Hit Narayan Guru Molestation Case Accused In Court In Ahmedabad

Video : अहमदाबादेत लंपट शिक्षकाची कोर्टातच पोलिसांसमोर धुलाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - नागरिकांनी पोलिसासमोरच या शिक्षकाला चोप दिला. - Divya Marathi
फोटो - नागरिकांनी पोलिसासमोरच या शिक्षकाला चोप दिला.
अहमदाबाद - शहरातील वस्त्रापूर परिसरात असलेल्या नारायण गुरू विद्यालयात मुलबरोबर छेडछाड करणार्‍या शिक्षकाची नागरिकांनी कोर्टाच्या परिसरातच धुलाई केली. पोलिसांच्या समोरच या शिक्षकाला जमावाने चोप दिला.
खटल्याच्या सुनावणीनंतर जेव्हा शिक्षकाला कोर्टाबाहेर आणण्यात आले त्यावेळी रागावलेल्या नागरिकांनी त्याला मारहाण सुरू केली. एका महिलेने तर त्या शिक्षकाला चपलेले मार मार मारले. पोलिसांनी गर्दीपासून त्याला वाचवत शिक्षकाला बाहेर नेले.

नारायण गुरू विद्यालयात मुलीबरोबर छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आल्याने शिक्षक सचिन डांगी याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी सचिन फरार झाला होता. त्याने कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीला पोलिसांनी हजर केले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, घटनेचा VIDEO