आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेधुंद होत थिरकल्या तरुणी, पाहा पारंपरिक गरबा नृत्यांवर कसा धरला ठेका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातच्या अहमदाबाद, राजकोट, सूरत अशा विविध शहरांमध्ये सध्या केवळ एकच धूम आहे ती म्हणजे गरब्याची. जिकडे तिकडे तरुण तरुणी केवळ गरब्याच्याच रंगात न्हाऊन गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते. गुजरातमधील लोकांच्या रक्तात गरबा नृत्य भिनलेले पाहायला मिळते. त्यामुळे या दहा दिवसांत संपूर्ण वर्षभरासाठी ऊर्जा मिळवून पुन्हा आपल्या कामाला लागायचे असा प्रयत्न गुजराती बांधवांचा असतो.

आज म्हणजेच सोमवारी गरब्याचा अखेरचा दिवस असणार आहे. त्यामुळे आजच्या गरब्याची जय्यत तयारी तरुणाईने केलेली आहे. पण रविवारीही तरुणाईने गरब्याचा मनसोक्त आनंद लुटला. एक तर सुटीचा दिवस असल्याने इतर दिवसांच्या तुलनेत रविवारी गर्दीत वाढ झालेली होती. सगळीकडे पारंपरिक वेशामध्ये नटलेल्या तरुणी असेच चित्र पाहायला मिळत होते. पारंपरिक गुजराती गाण्यांबरोबरच बॉलीवूडच्या हिट्सवरही तरुणांनी ठेका धरला. पाहुयात रविवारच्या गरबा महोत्सवातील हीच धामधूम पाहुयात फोटोंच्या माध्यमातून.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गुजरातच्या अहमदाबाद, सूरत आणि राजकोटमधील गरबा ऊत्सवाचे PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...