आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्कप्रमाणेच अहमदाबादमध्येही कारद्वारे चिरडून दहशतवादी हल्ला करण्याचा होता कट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटक करण्यात आलेला दहशतवादी. - Divya Marathi
अटक करण्यात आलेला दहशतवादी.
सूरत - आठ दिवसापूर्वी गुजरातमध्ये अटक करण्यात आलेल्या ISIS च्या दोन संशयित दहशतवाद्यांच्या गुजरात एटीएसने केलेल्या चौकशीत नवी माहिती समोर आली आहे. त्यात असे सांगण्यात आले आहे की, न्यूयॉर्कप्रमाणेच अहमदाबादच्या खाडिया भागात धार्मिक स्थळाबाहेर यहुदींना कारने चिरडून त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. अटक करण्यात आलेला दहशतवादी मोहम्मद कासीमसह चेन्नईहून एक हल्लेखोर हा हल्ला करण्यासाठी येणार होता. सुत्रांच्या माहितीनुसार यहुदींवर हल्ल्यासाठी 3 कट  केल्याची चर्चा करण्यात आली होती. पण अंतिम निर्णय कारद्वारे हत्या करण्याचा होता. 
 
हल्ला करून फरार होण्याचा प्लान.. 
- एटीएसने 25 ऑक्टोबरला सूरतमधून उबेद मिर्जा आणि अंकलेश्वरमधून मोहम्मद कासीम टिम्बरवाला या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. हे दोघे IS साठी भारतात काम करत होते, असा आरोप आहे. अहमदाबाद आणि बंगळुरूमध्ये यहुदींच्या धर्मस्थळावर हल्ला करून भारतातून फरार होण्याचा त्यांना प्लान होता. कासीमने तर पळून जाण्याची पूर्ण तयारीही केली होती. पण आधीच एटीएसने दोघांना अटक केली. 
- आता या दहशतवाद्यांची चौकशी करून या संपूर्ण नेटवर्क आणि कटाबाबत माहिती मिळवली जात आहे. याच चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार अहमदाबादच्या खाडिया भागात यहिदींच्या धर्मस्थळाहून मगेन अब्राहम सिनागोगवर हल्ला करण्याचा समावेश होता. कासीमने कबूल केले आहे की, तो चेन्नईच्या एका व्यक्तीच्या मदतीने हा हल्ला घडवून आणणार होता. 
 
 
बातम्या आणखी आहेत...