आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi And PM Abe Called For Pakistan To Bring To Justice Perpetrators Of Terror Attacks

मुंबई-पठाणकोट हल्ल्यातील दोषींना PAK ने शिक्षा द्यावी, मोदी-अॅब यांचे संयुक्त निवेदन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गांधीनगर - नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी गुरुवारी संयुक्त निवेदन जारी केले आहे. यात उभय देशांच्या पंतप्रधानांनी पठाणकोट हल्ल्याचा उल्लेख केला आहे. निवेदनात म्हटले आहे, की पाकिस्तानने 2008 मधील मुंबई हल्ला आणि 2016 मधील पठाणकोट हल्ल्यातील दोषींना शिक्षा द्यावी. भाषणाची सुरुवात मोदींनी जपानीमध्ये तर शिंजो अॅबे यांनी हिंदीत केली. या द्विपक्षीय चर्चेत संरक्षण, ट्रान्सपोर्टसह विविध क्षेत्रातील करार झाले. 
 
अल-कायदा, लष्कर विरुद्ध एकत्रित लढा 
- शिंजो अॅबे आणि मोदींनी संयुक्त निवेदनात म्हटले की ते पाचव्या जपान-भारत टेररिजम कन्सल्टेशनच्या आयोजनाच्या दिशेने पुढे निघाले आहेत. दोन्ही देश दहशतवादाविरोधोतील लढाईत एकमेकांना सहकार्य करतील. अल-कायदा, आयएसआयएस, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोएबा आणि यांच्याशी संबंधीत संघटनांविरोधात एकत्रित लढा देतील. 
- दोन्ही देशांनी उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक मिसाइल आणि न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करण्याच्या कार्यक्रमाची निंदा केली. 
 
मोदींच्या संयुक्त निवेदनातील 5 मुद्दे 

1 - जपानी भाषेत सुरुवात
- मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जपानी भाषेत केली. ते म्हणाले, कोनीचीवा (गुड आफ्टरनून) मी शिंजो अॅबे यांचे स्वागत करतो. मला आनंद होत आहे की अॅबे यांचे भारतात स्वागत करण्याची संधी मिळत आहे. अॅबे आणि मी अनेकदा आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये भेटलो आहे. भारतात त्यांचे स्वागत करताना विशेष आनंद होत आहे. 
 
2 - हायस्पीड ट्रेन भविष्यातील लाइफ लाइन 
- मोदी म्हणाले, 'काल सायंकाळी साबरमती आश्रमात गेलो आणि आज दांडी कुटीरला भेट दिली. या दोन्ही भेटींदरम्यान महात्मा गांधींचे विचार आणि जीवन विस्ताराने समजून घेण्याचा प्रयत्न केला. जपानसोबत आम्ही मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रोजेक्ट सुरु करत आहोत, त्याचे भूमिपूजन केले. भविष्यातील गरज लक्षात घेऊन रेल्वे तंत्रज्ञानाचा हा विकास असल्याचे आम्ही पाहातो.'
 
3- जपानची गुंतवणूक 80% वाढली 
- आमची स्पेशल स्ट्रॅटेजिक आणि ग्लोबल पार्टनरशिपचा विस्तार झाला आहे. जपान दौऱ्यावेळी सिव्हिल न्यूक्लिअरबाबत सहमती झाली होती. यासाठी संसद आणि जपानचे पंतप्रधान अॅबे यांचे आभार व्यक्त करतो. क्लीन अॅनर्जी आणि क्लायमेट चेंजसाठी या कराराने नवा अध्याय निर्माण केला आहे. 
 
4 - जपानी लोक आवडीचे खाद्य पदार्थ मागवू शकतील
- मोदी म्हणाले, 'येणाऱ्या काळात भारतात जपानी समुदाय वाढू शकतो. आम्ही जपानी नागरिकांसाठी व्हिसा आणि अराव्हल सुविधा दिली आहे. आता इंडिया पोस्ट आणि जपान पोस्ट च्या सहकार्याने कुल बॉक्स सर्व्हिस सुरु करणार आहे. यामुळे भारतात राहाणाऱ्या जपानी लोकांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ मागवणे सोपे होणार आहे.'
 
5 - भारतात जपानी रेस्तराँ सुरु करा, फायदा होईल 
- जपानी समुदाला माझे आवाहन आहे की त्यांनी भारतात जपानी रेस्तराँ सुरु करावे. आज भारत बदलत आहे. अनेक बदल भारताने स्वीकारले आहे. जपानसाठी ही मोठी संधी आहे. आम्हाला आनंद आहे की जपानच्या अनेक कंपन्यांनी भारत सरकारसोबत सहकार्य करार केला आहे. 
 
गुरुवारी काय-काय झाले 
 
बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे भूमिपूजन 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी साबरमती स्टेडियम येथे बुलेट ट्रेनची कोनशिला ठेवली. यावेळी मोदींनी या प्रोजेक्टसाठी स्वस्त दरात कर्ज घेण्याची गुजराती पद्धत सांगितली. त्यांनी सांगितले की जपानने 88 हजार कोटी रुपये कर्ज फक्त 0.1% व्याज दराने दिले आहे. 
 
पुढची भेट बुलेट ट्रेनने -अॅबे 
- शिंजो अॅबे म्हमाले, 'माझे मित्र नरेंद्र मोदी वैश्विक नेते आहे. दोन वर्षंपूर्वी त्यांनी बुलेट ट्रेन आणि न्यू इंडियाचा निर्णय घेतला. मी आणि जपानी कंपन्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. पुढचा दौरा हा बुलेट ट्रेननेच करणार.' 
बातम्या आणखी आहेत...