आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी? पंतप्रधानांकडून गुरुदक्षिणेचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावर्षी जुलै महिन्यात राष्ट्रपती निवडणुका होणार आहेत. या पदासाठी भाजपने अडवाणींचे नाव अंतिम केले असल्याची माहिती मिळत आहे. (फाइल) - Divya Marathi
यावर्षी जुलै महिन्यात राष्ट्रपती निवडणुका होणार आहेत. या पदासाठी भाजपने अडवाणींचे नाव अंतिम केले असल्याची माहिती मिळत आहे. (फाइल)
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर आता भाजपला आपल्या आवडीचा राष्ट्रपती मिळणे जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव समोर आले आहे. याबाबत निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी ८ मार्च रोजी सोमनाथमध्ये एका बैठकीत चर्चाही झाली होती. या बैठकीला नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अडवाणीही हजर होते. माझ्याकडून आडवाणींना ही गुरुदक्षिणा असेल, असे संकेत मोदींनी या बैठकीत दिले होते.

निकालानंतर अडवाणींचे नाव अंतिम मानले जात आहे. सोमनाथमध्ये झालेल्या विशेष बैठकीत केशुभाई पटेलही हजर होते. त्याच वेळी मोदींनी जर उत्तर प्रदेश निवडणुकीचे निकाल भाजपच्या इच्छेप्रमाणे लागले तर ते आपले गुरू अडवाणींना राष्ट्रपतिपदी बसलेले पाहू इच्छितील, असे संकेत दिले होते.  याच वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रपतिपदाची निवडणूक होईल.

सोमनाथमध्ये झाली होती खास बैठक 
- सोमनाथमध्ये जालेल्या त्या खास बैठकीत मोदी, शहा, अडवाणी यांच्याबरोबर केशुभाई पटेलही उपस्थित होते. त्याचवेळी मोदींनी संकेत दिला होता की, जर उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचे मनासारखे निकाल लागले तर, ते त्यांचे गुरू म्हणजे अडवाणींना राष्ट्रपती पदावर बसवू इच्छितात. याच वर्षी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका सुरू होतील. 

सोमनाथ यात्रेपासून सुरू झाली होती मोदींची राष्ट्रीय कारकीर्द 
- अडवाणी आणि मोदींची सोमनाथमध्ये झालेली भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. 1990 मध्ये आडवाणींनी सोमनाथपासून अयोध्येपर्यंत यात्रा केली होती. त्यावेळी मोदींना त्यांनी त्यांचा सारथी म्हणून प्रोजेक्ट केले होते. 
- त्याचवेळी मोदींची राष्ट्रीय राजकारणात एंट्री झाली होती. मोदींना गुजरातचा मुख्यमंत्री बनवण्यातही अडवाणींची महत्त्वाची भूमिका होती. 2002 च्या गुजरात दंगलींबाबत जेव्हा वाजपेयी मोदींवर नाराज झाले होते, त्यावेळीही अडवाणींनी मोदींचा बचाव केला होता. 

युपीच्या निकलांनी मत बदलले 
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले गेले तेव्हा अडवाणींनीच विरोध सुरू केला होता. तरीही मोदी पंतप्रधान बनले. तेव्हापासूनच अडवाणींनी मौन धरले होते. त्यानंतर दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे मानले जात होते. 
- पण युपीसह 5 राज्यांतील निवडणुकांच्या निकालांनंतर अडवाणींनी तडजोडीचे धोरण अवलंबले आहे. 

असाही योगायोग 
- 1990 मध्ये अडवाणींनी सोमनाथ यात्रा सुरू केली होती. त्यावेळी मोदी 3 दिवस आधीच सोमनाथला पोहोचले होते. त्यावेळी ते अडवाणींचे सारखी होते. पण आता काळ बदलला आहे. 8 मार्चला मोदी सोमनाथला पोहोचले. पण त्याआधीच 7 मार्चला अडवाणी सोमनाथला पोहोचले होते. 
 
पुढे पाहा, संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...