आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय रेल्वे जगाच्या तुलनेत ९० टक्के मागे, अजूनही तेच हिरवे झेंडे दाखवले जातात - मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच बडोद्याला आले. देशातील दुसरे इको फ्रेंडली हरणी एअरपोर्ट येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या इंटरनॅशनल टर्मिनलचे उद्घाटन यावेळी मोदींनी केले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, "जगाच्या तुलनेत भारतीय रेल्वे 90 टक्के मागे आहे. अजूनही तेच जुने डब्बे, तेच हिरवे झेंडे दाखवणे." येथे त्यांनी देशातील दुसरे इको फ्रेंडली हरणी एअरपोर्टवर बनलेल्या इंटरनॅशनल टर्मिनलचे उद्घाटन केले. तसेच ते म्हणाले, की "अमेरिकेच्या एकूण लोकसंख्ये एवढे लोक येणाऱ्या काही वर्षात विमान प्रवास करतील असा अंदाज आहे."
- उद्घाटन भाषणात मोदींनी गुजरातीमध्ये सुरुवात केली.
- मोदी म्हणाले, ''आता बडोदा विमानतळाचे नाव देशामध्ये आदराने घेतल्या जाईल. नवीन सरकार बनल्यानंतर कोच्ची नंतर हे दुसरे हरीत विमानतळ (ग्रीन एअरपोर्ट) आहे.
- "कोळशाच्या राखेने बनलेल्या विटांनी या इमारतीला उभारण्यात आले आहे. यामुळे इको फ्रेंडली असण्यासोबतच मजबूतीसुध्दा मिळते."
- "अमेरिकेच्या लोकसंख्ये एवढे लोक येणाऱ्या काही वर्षात विमानाने प्रवास करतील. आता विमानप्रवास हे एक स्टेटस सिंबॉल झाले आहे."
- "आमच्या सरकारने नवी एव्हिएशन पॉलिसी बनवली, ज्यामुळे देशामध्ये हे सेक्टर अत्यंत वेगाने पुढे जात आहे."
- "भारतात पर्यटन वेगाने वाढत आहे. तसेच विमान प्रवास करणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे."
- "तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत जगाच्या तुलनेत 90 टक्के मागे आहे. अजूनही तेच जुन्या बोगी, तेच जुने हिरवे झेंडे दाखवण्याची पध्दत अजूनही रुढ आहे."
- "बडोद्यात देशातील पहिली रेल्वे युनिव्हर्सिटी बनणार आहे. येथून निघालेले प्रोफेशनल्स रेल्वेला एका वेगळ्या दिशेने नेतील. यामध्ये बडोद्याची मुख्य भूमिका असेल."
160 कोटीं रुपये खर्च करून उभारले टर्मिनल
- मोदी 2014 लोकसभा निवडणूकीत वाराणसीसोबतच बडोद्यातूनही जिंकले होते. मात्र त्यांनी बडोद्याचे सिट सोडले होते.
- हरणी एयरपोर्टच्या या टर्मिनलला इंटरनॅशनल स्टँडर्डच्या सुविधांना लक्षात ठेवून बनवण्यात आले आहे. यामध्ये एकूण 160 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या एयरपोर्टला इंटरनेशनल हॅबिटेट असेसमेंटमध्ये ग्रीन रेटींग मिळाले आहे.
- विमानतळावर 18 चेक-इन काऊंटर तयार करण्यात आले आहे. येथे ताशी 700 प्रवाशी एंट्री करु शकतात.
- देशातील पहिल्या ग्रीन एअरपोर्टची सुरुवात गेल्या वर्षी चंदीगडमध्ये सुरु झाली आहे.

पुढील स्लाईडवर पाहा इतर फोटोज..
बातम्या आणखी आहेत...