आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदींनी तोडला सेक्युरिटी प्रोटोकॉल, गाड्यांचा ताफा टाळून 1 कार घेऊन गेले आईच्या भेटीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्यासोबतचा लवाजमा बाजूला ठेवत थेट स्वत: गाडी चालवून भाऊ पंकज मोदी यांचे घर गाठले. निमित्त होते ६६ व्या वाढदिवसानिमित्त आई हिराबा यांच्या भेटीचे. लाडक्या मुलाला भेटल्यानंतर हरखून गेलेल्या ९७ वर्षीय प्रेमळ हिराबांनी अनेक उत्तम आशीर्वाद दिले.

गांधीनगरमधील रायसन भागात मोदी यांचा १९५० मध्ये जन्म झाला. त्याच भागात मोदी यांचे बंधू पंकज मोदी यांच्यासमवेत हिराबा राहतात. आईसोबत ते २५ मिनिटे होते. त्यानंतर त्यांनी दोन कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यामध्ये आदिवासी व विशेष लोकांशी त्यांनी संवाद साधला. घरात दाखल होताच मोदींनी आईच्या चरणी माथा ठेवून आशीर्वाद घेतले. जन्मदिनानिमित्त मोदींवर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. त्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राजकीय नेते, चित्रपट, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचाही समावेश होता.
४ हजार ८१७ कोटींच्या प्रकल्पाचे उद््घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी जलसिंचन व पाणी प्रकल्पाचे उद््घाटन झाले. सुमारे ४ हजार ८१७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. दाहोड जिल्ह्यातील आदिवासींना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.
पाण्याच्या कमतरतेमुळे आदिवासींना अनेकदा स्थलांतर करण्याची वेळ येते. परंतु गुजरातमध्ये आपल्या नेतृत्वाखालील सरकारने पाण्यासाठी सर्वोच्च आर्थिक नियोजन केले होते, याची आठवण मोदी यांनी या वेळी करून दिली.

प्रोटोकॉल तोडून आईच्या भेटीसाठी
- आईच्या भेटीसाठी जात असताना मोदींनी पंतप्रधानांसाठीचा असलेला ताफा सोबत नेला नाही. मोदींना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा असते.
- त्यांच्या ताफ्यात साधारणपणे 20 पेक्षा जास्त गाड्या असतात, त्यात सुरक्षा रक्षकांसह पर्सनल स्टाफ, आणि अॅम्ब्युलन्स यांचा समावेश असतो.
- वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, मोदी त्यांच्या ताफ्याशिवाय आईच्या भेटीसाठी एका एसयूव्ही कारमधून आले.
- मोदी ज्या मार्गावरुन येणार होते त्या मार्गावर नाकेबंदी करण्यात आली होती.
महाराष्ट्रातून मोदींना 66 फूट लांब ग्रिटिंग
- महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वीरेंद्र हालिंगळे यांनी मोदींच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त 66 फूट लांब ग्रिटिंग पाठवले आहे.
- वीरेंद्र यांनी सांगितले, पंतप्रधानांसाठी हे स्पेशल ग्रिटिंग तयार करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागला.
- हे लांबलचक ग्रिटिंग तीन रंगांमध्ये आहे. त्यावर मोदींचे विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले फोटो आणि देश-विदेशातील त्यांच्या भाषणांचे कटिंग आहेत.

वाराणसीमध्ये जय्यत तयारी
- नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथेही त्यांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
- येथील आयोजक सुरेश सिंह यांनी सांगितले, की रोहनिया बाजार येथील रामलीला मैदानात एक मोठा स्टेज तयार करण्यात आला आहे.
- तिथे पुजा झाल्यानंतर 66 किलो लाडूंचे वाटप केले जाणार आहे. स्थानिक भाजप कार्यकर्ते अशोक यादव यांनी सांगितले की मोदींच्या वाढदिवसानिमित्त लोकांना मिठाई वाटप केली जाईल.

दिल्लीत केकचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याची तयारी
- मीडिया रिपोर्टनुसार, दिल्लीतील एक एनजीओ शक्ती फाऊंडेशन मोदींच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य केक तयार करणार आहे.
- याआधी सर्वात मोठा केक पोलंड येथील रेसजो इंटरनॅशनल फेअरमध्ये 21 मे 2011 रोजी मोठा केक कापला गेला होता. त्याची उंची 1.74 मीटर आणि वजन 720.8 किलो होते.
- दिल्लीतील केक बेटी बचाओ, बेटी पढाओ संदेश देणारा असेल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आई-मुलाच्या भेटीचे फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)