आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्छ: रणोत्सवात PAK बॉर्डरजवळ तीन दिवस तंबूत राहाणार पंतप्रधान मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कच्छ- गुजरातमधील कच्छमध्ये दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘रणोत्सव’ 15 डिसेंबरपासून सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरपासून रणोत्सवात सहभागी होणार आहेत. इतकेच नव्हे तर नरेंद्र मोदी पाकिस्तान बॉर्डर जवळ तीन दिवस तंबूत राहाणार आहेत. यादरम्यान मोदींनी पोलिस महासंचालकांची (डीजीपी) बैठक बोलावली आहे.

रणोत्सवादरम्यान हा परिसर ‘नो फ्लाय झोन’ म्हणून जाहीर करण्‍यात आला आहे. 'रणोत्सव' हा जगातील सर्वात मोठा उत्सव असून तो 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

चोख सुरक्षाव्यवस्था:
- रणोत्सवादरम्यान चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
- 50 किलोमीटर परिसरात ‘नो फ्लाय झोन’ घोषित करण्‍यात येणार आहे.
- ‘एंटी एअरक्राफ्ट गन्स’ तैनात करण्‍यात येणार आहे.
- आकाशात काही संशयास्पद दिसल्यास त्याच्यावर निशाणा साधला जाणार आहे.
- यादरम्यान ड्रोनचा वापर करण्‍यात येणार नाही.

मोदी तीन दिवस राहाणार तंबूत...
पंतप्रधान मोदी डीजीपी मीटिंग दरम्यान तीन दिवस मेकशिफ्ट टेंट (तंबूत) राहाणार आहे. कच्छमधील रणपासून पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बॉर्डर खूप जवळ आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान डीजीपी मीटिंगच्या अंतिम दिवशी भाषण देणार आहे.

दरम्यान, दहशतवादी संघटना आयएस इंटरनेटच्या माध्यमातून युवकांचे लक्ष विचलीत करण्‍याचा प्रयत्न करत आहे. यावर डीजीपी मीटिंगमध्ये चर्चा होणार आहे. आयएसमध्ये सहभागी झालेल्या भारतीय नागरिकांचे प्रमाण कमी आहे. परंतु याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) यावेळी खास प्रेझेटेंशन करणार आहे.

सीक्रेट ऑपरेशन्सच्या माध्यमातून केरळ, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील काही युवकांना आयएसमध्ये सहभागी होण्यापासून रोखले जाणार आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील दादरी येथील घटना व मुझफ्फरनगरमध्ये उसळलेल्या दंगलीवर चर्चा करण्यात येणार आहे.