आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन पोहोचल्या अंबाजी चरणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: अंबाजी मंदिरात पूजा करताना जशोदाबेन)

बनासकांठा- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनी गुजरात प्रसिद्ध अंबाजी मंदिरात प्रक्षालन विधी अर्थात साफ-सफाईत शुक्रवारी (11 सप्टेंबर) सहभाग घेतला. भाद्रपद पोर्णिमेला माता अंबाजीची यात्रा असते. त्यानंतर येणार्‍या शुक्रवारी मंदिरात प्रक्षालन विधी अर्थात मंद‍िराची साफ-सफाई केली जाते.

यंदाच्या पक्षालन ‍विधीसाठी जशोदाबेन आल्या होत्या. अन्य भक्तांसोबत जशोदाबेन यांनी ही मंदिराची साफ-सफाई करून अंबा मातेची पूजा केली. जशोदाबेन यांना साफ-सफाई करताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. जशोदाबेन यांना पाहाण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. जशोदाबेन यांचे भाऊ देखील आपल्या कुटुंबियांसोबत मंदिरात आले होते.
जशोदाबेन यांची छायाचित्रे पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्किक करा...(सभी छायाचित्रे- दिव्य भास्कर)