आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना भेटण्यासाठी निघालेल्या महिला सरपंचाला सुरक्षा रक्षकांनी रोखले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - उत्तर प्रदेशातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी ते 6 हजार महिला सरपंचाच्या संमेलनाला उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील एका महिला सरपंचाने पंतप्रधानांना भेटण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी महिलेला अडवले. यामुळे थोडा गोंधळ उडाला. मोदींनी महिला सरपंचांच्या संमेलना स्त्री भ्रूण हत्येचा मुद्दा उपस्थित केला. मोदी म्हणाले, 'ज्या गावात महिला सरपंच आहे तेथे भ्रूण हत्या झाली नाही पाहिजे. मुलांना गावात ज्याप्रमाणे शिक्षण मिळते तोच अधिकार मुलींना मिळाला पाहिजे. त्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज नाही.' 
 
 मोदींच्या भेटीला निघालेल्या महिला सरपंच काय म्हणाल्या... 
 - मोदींच्या भेटीसाठी निघालेल्या सरपंचाचे नाव शालिनी राजपूर होते. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील एका गावाच्या त्या सरपंच आहे. 
 - सरपंच म्हणून कामकाज पाहात असताना पुरुष कसे अडकाठी आणतात हे सांगण्यासाठी त्या पंतप्रधानांकडे जात होत्या.
 
 मोदी काय म्हणाले
 - मोदी म्हणाले, ज्याला आपल्या आयुष्याचे ध्येय काय आहे ते कळते, ती व्यक्ती कोणत्याही संकटचा सामना करुन आपले ध्येय साध्य होईपर्यंत शांत राहात नाही.
- महिलांच्या गुणांबद्दल मोदी म्हणाले, 'एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे की महिलांमध्ये नवे शिकण्याची इच्छा जास्त असते. आपल्या क्षमतांचा पूरेपूर वापर करण्यात महिला अग्रेसर असतात. जबाबदारी घेण्यास आणि ती पूर्ण करण्यातही महिला मागे राहात नाहीत.'
- भ्रूण हत्येबद्दल चिंता व्यक्त करताना मोदी म्हणाले, 'ज्या गावात महिला सरपंच आहे तेथे भ्रूण हत्या झाली नाही पाहिजे. मुलांना गावात ज्याप्रमाणे शिक्षण मिळते तोच अधिकार मुलींना मिळाला पाहिजे. त्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज नाही.' 
- स्वच्छतेचा आणि महिलांचा थेट संबंध असल्याचे सांगत मोदी म्हणाले, की गावात स्वच्छता असेल तर इतर गोष्टी आपोआप व्यवस्थित होतील. 
बातम्या आणखी आहेत...