आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस, सोमनाथ मंदिरात केली पुजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. बुधवारी मोदी, सोमनाथ मंदिरात पोहोचले आणि पुजा अर्चना केली. त्यांच्याबरोबर पती अमित शहादेखिल होते. त्यापूर्वी मंगळवारी त्यांनी भरूचमध्ये देशातील सर्वात लांब केबल ब्रिजचे उद्घाटन केले होते. 

यावर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका आहेत.. 
- गुजरातमध्ये याचवर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यासाठी मोदींनी तयारी सुरू केली आहे. 
- गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यापूर्वी मोदींनी सोमवारी भरूचमध्ये एका ब्रिजचे इनॉगरेशन केले. 
- सोमनाथमध्ये मोदींबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेलही उपस्थित आहेत. 

सोमनाथचे म्हत्त्व.. 
- सोमनाथ मंदिर समुद्र किनाऱ्यावर आहे. शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये याचा समावेश आहे. 
- 1026 मध्ये मोहम्मद गजनीने सोमनाथ मंदिरावर हल्ला केला होता. त्याने याठिकाणची संपत्ती लूटली होती. 
- 1951 मध्ये भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंदिराचे रिनोव्हेशन केले होते. 

देशातील सर्वात लांब केबल ब्रिज 
- मोदींनी भरूचमध्ये मंगळवारी देशातील सर्वात लांब केबल ब्रिजचे इनॉगरेशन केले. 
- हा फोरलेन ब्रिज नॅशनल हायवे-8 वर नर्मदा नदीवर तयार करण्यात आला आहे. 
- त्यापूर्वी मोदींनी भरूचमध्येच ओपलच्या पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्सचे उदघाटनही केले. 
- केबल स्टे ब्रिजची लांबी 1344 मीटर आहे. हा ब्रिज तयार करण्यासाठी दोन वर्षे लागली. तर 379 कोटी रुपये खर्च झाले. 
- ब्रिज सुरू झाल्याने अहमदाबाद-मुंबई नॅशनल हायवे-8 वर भरूचमध्ये होणाऱ्या कोंडीवर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO आणि VIDEO
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...