आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना नीच म्‍हटल्‍याबद्दल अय्यर काँग्रेसमधून निलंबित, राहुल यांच्‍या सांगण्‍यावरुन मागितली माफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ सुरत- गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांनी आपल्याच पक्षाला हादरा दिला. पंतप्रधान मोदींचा उल्लेख करताना त्यांनी ‘नीच’ शब्द वापरला आणि मोदींसह भाजपने ही संधी साधली. मणिशंकर यांचा उल्लेख करत प्रत्येक सभेत त्यांनी काँग्रेसला घेरले. मोदींनी सुरत येथे अय्यर यांचे वक्तव्य गुजरातचा अपमान असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘मी भलेही नीच जातीचा, पण कामे उच्च केली आहेत.’ दरम्यान, भाजप नेते काँग्रेसला घेरण्यासाठी मैदानात उतरली, तर काँग्रेसने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. राहुल यांनी ट्विटरवर अय्यरना माफी मागण्यास सांगितले. १० मिनिटांनी अय्यर खुलासा करत राहिले. यादरम्यान राहुल यांनी रात्री १०च्या सुमारास त्यांना पक्षातून निलंबित केले.


द ग्रेट इंडियन पॉलिटिकल थिएटर

 

> नरेंद्र मोदी : १२.०० वाजता, नवी दिल्ली
- राहुल यांना टोमणा : बाबासाहेबांवर मते मागणाऱ्यांना आता बाबा भोले आठवले
आंबेडकर सेंटर उभारणीचा निर्णय १९९२ मध्ये होऊनही २३ वर्षे काहीच झाले नाही. बाबासाहेबांच्या नावावर मते मागणाऱ्यांना बाबा भोले आठवत आहेत. एका कुटुंबासाठी बाबासाहेबांचे योगदान मिटवण्याचा प्रयत्न झाला. 

 

> मणिशंकर अय्यर: २.५० वाजता, नवी दिल्ली
- अांबेडकरांची स्वप्ने साकार करण्यात नेहरू यांनी मोठे योगदान दिले होते
अांबेडकरांच्या स्वप्नपूर्तीत नेहरूंचे मोठे योगदान हाेते. आता त्या परिवाराबाबत इतक्या गलिच्छ बाबी बाेलाल. ही व्यक्ती नीच प्रवृत्तीची आहे. त्याच्यात सुसंस्कृतपणा नाही. अशा प्रसंगी इतके घाणेरडे राजकारण का?

 

> नरेंद्र मोदी : ४.२० वा. सुरत
- या अपमानाचा बदला मतपेट्यांतून दिसेल
अय्यर म्हणतात मोदी नीच जातीचा आहे. हा गुजरातचा अपमान आहे. मोगली संस्कार असलेल्यांना माझ्यासारख्यांचे चांगले कपडे सहन होत नाही. तुम्ही आम्हाला गाढव, नालीतील किडा संबोधले. गुजरातच्या पुत्राच्या अपमानाचा बदला कसा घेतला जातो हे १८ तारखेला मतपेट्याच सांगतील.


> राहुल गांधी : ५.०२वा, ट्विट 
- पीएमची भाषा वाईट, मात्र  काँग्रेसी संस्कृती वेगळी
काँग्रेसविरुद्ध भाजप आणि पंतप्रधानही खालची भाषा वापरतात. मात्र काँग्रेसचा वारसा वेगळा आहे. पीएमसाठी अय्यर यांच्या भाषेचे समर्थन करत नाही. यासाठी ते माफी मागतील, अशी आशा आहे.


>मणिशंकर अय्यर : ५.१२ वाजता
- मी फ्रीलान्स काँग्रेसी; हिंदी भाषिक नाही, जर चुकीचे बोलून गेलो असेल तर सॉरी...
मुश्किलीने हिंदी शिकलो. लो (Low) या इंग्रजी शब्दाचा अनुवाद करून ‘नीच’ म्हणालो. लो बॉर्न म्हणजे खालच्या जातीत जन्मलेला, असा माझा अर्थ नव्हता. नीचचा अर्थ लो बॉर्न असेल तर माजरत (माफी) मागतो. सॉरी...

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, अय्यर यांची आत्मघाती वक्तव्ये...

 

बातम्या आणखी आहेत...