आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात दौऱ्यामध्ये पीएम मोदी म्हणाले, इराणचे चाबहार पोर्ट थेट कांडला पर्यंत जोडले जाणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / अहमदबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी कच्छ येथे बोलताना मोदी म्हणाले, कांडला थेट इराणच्या चाबहारशी जोडले जाणार आहे. विशेष म्हणजे, या वर्षी पीएम मोदींचा हा तिसरा गुजरात दौरा आहे. गुजरातमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय गुजरात दौर्‍याला आजपासून सुरुवात झाली आहे. आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेच्या सर्वसाधारण बैठकीलाही मोदी उपस्थित राहाणार आहे. बैठकीत विकासकामांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मोदी कच्छमध्ये दोन सभांना संबोधित करतील. कांधला पोर्टमध्ये आज (सोमवारी) उपक्रमांच्या उद्धघाटनाने मोदी यांच्या दौर्‍याला सुरुवात होणार आहे. मोदींचा गुजरातमधील यंदाचा हा तिसरा दौरा आहे.

दुसरीकडे, पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने आपल्या 50 कार्यकर्त्यांसोबत मुंडण करून नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याला कडाडून विरोध केला आहे. इतकेच नव्हे तर पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या (PASS) सदस्यांनी एक न्याय यात्राही काढली आहे. पाटीदार समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारच्या विरोधात ही यात्रा काढण्यात आली आहे.

हार्दिक पटेल याने जुलै 2015 पासून गुजरातमध्ये पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली सरकारने हार्दिक पटेलू याला सहा महिने हद्दपार केले होते. सहा महिने राजस्थानमध्ये राहिल्यानंतर 5000 गाड्यांच्या ताफ्यात हार्दिक पटेल गुजरातमध्ये परतला होता.

रतनपूर या राजस्थान सीमेवरील गावात त्याच्या समर्थकांनी त्याचे भव्य स्वागत केले. 23 वर्षीय हार्दिक उदयपूर येथे स्थायिक झाला होता. त्याच्या समर्थकांसह त्याने गुजरातमध्ये प्रवेश केला. पटेल समुदायातील शेकडो तरुणांनी जोशात हार्दिकचे स्वागत केले. साबारकांथा जिल्ह्यातील हिम्मतनगर शहरात त्याने रॅलीला संबोधित केले. गुजरातेत दाखल होताच पटेल समुदायाच्या न्याय्य हक्कांचा पुनरुल्लेख हार्दिकने केला.

गुजरातच्या भूमिला मी नमन करतो. ही भूमी महान नेत्यांची आणि हुतात्म्यांची आहे. मी नेहमी माझ्या समुदायाच्या न्याय्य हक्कांसाठी लढत राहील असे पटेल समुदायाच्या रॅलीला संबोधित करताना तो म्हणाला होता.

पुढील स्लाइडवर वाचा... गुजरात दौर्‍यापूर्वी मोदींनी केले ट्वीट...
बातम्या आणखी आहेत...