आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठिला दगड बांधून तरुणीला फेकले नर्मदेत, पोलिसांनी सोशल मीडियावर टाकले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाठिला दगड बांधलेला मृतदेह नर्मदा नदीत सापडला आहे. - Divya Marathi
पाठिला दगड बांधलेला मृतदेह नर्मदा नदीत सापडला आहे.
अहमदाबाद (गुजरात)- बनासकाठा जिल्ह्यातील थराद या गावाजवळ नर्मदा नदीत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीचे वय सुमारे 25 वर्षांच्या जवळपास असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओळख पटवण्यासाठी गुजरात पोलिसांनी तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत.
असा सापडला मृतदेह
- थराद गावातील काही नागरीक नर्मदा नदीजवळून जात होते.
- यावेळी त्यांना नर्मदेच्या पाण्यात मृतदेह दिसला. त्याच्या पाठीला भलामोठा दगड बांधला होता.
- त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली.
- मृतदेहाची माहिती मिळाल्यावर गावातील नागरिक या परिसरात जमा झाले.
- ही तरुणी गावातील किंवा या परिसरातील नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
काय म्हणाले पोलिस
- तरुणीची हत्या करुन मृतदेह दगडाला बांधून नदीत फेकला असावा असे पोलिसांनी सांगितले आहे.
- पण मृतदेह फेकण्यापूर्वी हत्या झाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत.
- कदाचित तिला बेशुद्ध करुन दगडाला बांधून नदीत फेकले असावे, असाही अंदाज आहे.
- तरुणीचा मृतदेह दगडाला तारांनी बांधलेला आढळून आला आहे. दोरीने तो बांधलेला नाही.
- नदीच्या पाण्यात राहून दोरी सुटून किंवा खराब होऊन मृतदेह पाण्यावर येऊ नये म्हणून असे केले असावे.
- या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला असून तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, तरुणीचे फोटो... अद्याप या तरुणीची ओळख पटलेली नाही....
बातम्या आणखी आहेत...