आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात निवडणूक : 50 वर्षांच्या सुनेला दिले BJP ने तिकिट, 35 वर्षांची सासू झाली नाराज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगेश्वरी देवी. - Divya Marathi
रंगेश्वरी देवी.

गोध्रा - बीजेपीने गुजरातमध्ये पंचमहाल जिल्ह्यातील कलोल मतदारसंघात खासदार प्रभातसिंग यांची 50 वर्षीय सून सुमनबेनला तिकिट दिले आहे. पण ही घोषमा होताच, त्यांच्या कुटुंबामध्ये ड्रामा सुरू झाला. खासदाराची 35 वर्षांची पत्नी रंगेश्वरी यावरून भडकली आहे. त्याचे कारण म्हणजे या जागेसाठी तिने तिकिट मागितले होते. पत्राच्या निर्णयावर प्रभात सिंह म्हणाले की, कुटुंबातील कोणालाही तिकिट मिळाले असले तरी चांगलेच आहे. त्यावर रंगेश्वरीने खासदार नवऱ्याला चॅलेंज केले आहे की, आईचे दूध प्यायला असशील तर सुनेच्या प्रचारासाठी कलोलला येऊन दाखव. 


facebook पोस्ट लिहिली आणि डिलीट केली... 
- सुमनला तिकिट मिळाल्यानंतर रंगेश्वरीने तिच्या फेसबूक पोस्टमध्ये प्रभात सिंहला चॅलेंज केले. नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली आणि तडजोड झाल्याचे जाहीर करण्यात आले. 
- भास्करशी बोलताना रंगेश्वरीने ही पोस्ट टाकली होती हे मान्य केले. पण भाजपला 22 संभाव्य उमेदवारांमध्ये एकही चांगला उमेदवार भेटला नाही का, यामुळे ती नाराज होती. 
- कलोलमध्ये चुकीच्या लोकांनी येऊ नये म्हणून तिकिटाची मागणी केली होती, असे रंगेश्वरी म्हणाल्या. 


तिला जिंकू देणार नाही.. 
- रंगेश्वरीने म्हटले की, कलोलमध्ये आतापर्यंत विकासाची दुकाने होती, आता दारुची दुकाने सुरू होतील. तिला कोणीही जिंकवणार नाही. कलोल विधानसभेला कँडिडेट पाहिजे, बाहेरून आलेला न्यक्ती नाही. जो कलोलचा असेल त्याला जिंकवून तिला जिंकू देणार नाही. 
- सुमनने म्हटले आहे की, तिला सासूच्या धमक्यांची भिती वाटत नाही. मी निवडणूक जिंकून दाखवेल. 


78 वर्षांच्या पटेल नेत्यांना पुन्हा तिकिट 
- भाजपच्या 5 व्या यादीत 13 उमेदवारांची नावे आहेत. त्यात 78 वर्षांच्या ऊंझा पटेल यांना पुन्हा तिकिट देण्यात आले आहे. 
- या यादीत गुजराती अॅक्टर हितेश कनोडिया, कांग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले अमित चौधरी आणि पीआय पटेल यांचे नावही आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...