आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Leaders Letter Accepted To Giving New PAN Card

पॅन कार्ड मिळवण्‍यासाठी आता नेत्यांचे पत्रही ग्राह्य धरले जाणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - परमनंट अकाउंट नंबर (पॅन) मिळवण्यासाठी आता आमदार, खासदार किंवा नगरसेवकांचे पत्रही ग्राह्य धरले जाईल. शिवाय, जन्मतारखेचा दाखलाही पॅन कार्डसाठी सक्तीचा करण्यात आला आहे. ‘सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस’ने (सीबीडीटी) पॅन कार्ड मिळवण्यासाठीच्या नियमांत हे बदल केले आहेत.
नव्या व्यवस्थेनुसार, अर्जदाराच्या रहिवासी प्रमाणपत्र किंवा ओळखपत्रासाठी ही राजकीय मंडळी शिफारस करू शकणार आहे. सनदी अधिका-यांनाही अशी शिफारस करण्याचा अधिकार असेल. अधिकारांची ही व्याप्ती एवढ्यावरच मर्यादित न ठेवता आता बँक अधिकारी व कंपनीच्या अधिका-यांनाही हे अधिकार देण्यात आले आहेत. बँक अधिकारी आपल्या खातेदारांची तर कंपनीचे अधिकारी कर्मचा-यांना प्रमाणपत्र देऊ शकतील.