आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Party Formed In The Name Of Narayan Sai

नारायणसाईच्या नावावर ‘ओजस्वी पार्टी’ स्थापन, दिल्लीत 70 जागांवर लढणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - लैंगिक शोषणप्रकरणी फरार आरोपी नारायणसाईच्या नावाचा वापर करून एका राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली आहे. या पक्षाला ‘ओजस्वी पार्टी’ असे नाव देण्यात आले आहे. नारायणसाई या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे दाखवण्यात आले आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षातर्फे 70 जागांवर उमेदवार उभे केले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. आसाराम आश्रमाच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांनी मात्र अशा प्रकारचा कोणताही पक्ष नसल्याचे म्हटले आहे. हा पक्ष नारायणसार्इंनी स्थापन केलेला नसून दुस-याच कोणीतरी दोन वर्षांपूर्वी या पक्षाची स्थापना केली होती. आसारामबापूंनी त्यासाठी फक्त आशीर्वाद दिला होता, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान ओजस्वी पार्टीतर्फे रविवारी जंतर - मंतरवर धरणे आंदोलन करणात आले.