आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WOMAN PRIDE AWARD: वयाच्‍या 21व्‍या वर्षी पटकाविली 186 पारितोषिके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन वयाच्‍या 21 व्‍या वर्षीच गुजरातच्‍या पुजा चौरसियाने 186 पारितोषिके पटकाविली आहेत. आंतरराष्‍ट्रीय ट्रायएथलीटचा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
ट्रायथलान स्‍पर्धांमध्‍ये एकाच स्‍पर्धेत तीन खेळ असतात. स्पर्धकाला पोहणे, वेगात सायकल चालवणे आणि धावणे अशा तीन टप्‍प्‍यात ही स्‍पर्धा पूर्ण करावी लागते. हा क्रिडाप्रकार खर्चिक असून परिस्थितीमुळे तिला या स्‍पर्धांत भाग घेणे शक्‍य वाटत नव्‍हते. तरीही परिस्थितीशी दोन हात करून तिने या खेळात सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले.
पुजाने खेळाची सुरुवात 2002 मध्‍ये झालेल्‍या पोहण्‍याच्‍या स्‍पर्धांपासून सुरु केली. तेव्‍हा तिचे वय अवघे 9 वर्षे होते. लहानपणापासूनच सुवर्णपदक जिंकण्‍याचे तिचे स्‍वप्‍न होते. अथक प्रयत्‍न आणि जिद्दीच्‍या जोरावर तिने हे स्‍वप्‍न पूर्ण केले. तिच्‍या प्रयत्‍नांना बघताच 2004 मध्‍ये झालेल्‍या इंडियन ट्रायथलान फेडरेशनच्‍या (आयटीएफ) ज्‍यूनिअर स्‍क्‍वॅड कँम्‍पमध्‍ये तिची निवड झाली होती.
2006 मध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्रीय एक्‍वाथल चॅम्पियनशिप स्‍पर्धेत तिने सुवर्णपदक पटाकाविले. या विजयानंतर आयटीएफ तिला ट्रायथलान स्‍पर्धेमध्‍ये सहभागी होण्‍याची संधी दिली. या स्‍पर्धेच्‍या तयारीसाठी तिच्‍याकडे चांगली सायकलही नव्‍हती. तिने भाडेतत्त्‍वावर घेतलेल्‍या साधारण सायकलवर तयारी करून ट्रायथलान स्‍पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. तिच्‍या या आश्‍चर्यकारक कामगिरीची नोंद घेत गुजरात स्‍टेट ट्रायथलान असोसिऐशनने तिला 2007 मध्‍ये झालेल्या 33 व्‍या राष्ट्रीय स्‍पर्धांमध्‍ये सहभागी होण्‍याची संधी दिली.
राष्‍ट्रीय स्‍पर्धांच्‍या तयारीसाठी घरच्‍यांनी मिळून तिच्‍यासाठी 10 हजार रुपयांची साधारण सायकल खरेदी केली. आसाममध्‍ये तिच्‍या या सायकलला पाहून अनेक स्‍पर्धेकांनी थट्टा उडवली. त्‍यांच्‍याकडे दीड लाखाहून महाग असलेल्‍या सायकली होत्‍या. त्‍यांच्‍या थट्टेला भीक न घालता पुजाने सरावावर लक्ष केंद्रीत केले आणि स्‍पर्धेत सुवर्णपदक जिंकून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. तिच्‍या या विजयाने गुजरातचे चौफेर नाव झाले.
तिची समाधानकारक प्रगती पाहता आयटीएफने चीनमध्‍ये होणा-या आंतरराष्ट्रीय आशियन चॅम्पियनशिप स्‍पर्धांसाठी तिची निवड केली. या स्‍पर्धांमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी तिच्‍याकडे आंतरराष्‍ट्रीय दर्जाची सायकल नव्‍हती तेव्‍हा गुजरातचे स्‍थानिक उद्योजक राजन शाह यांनी तिला स्‍पेशल सायकल खरेदीसाठी मदत केली. तिच्‍या कामगिरीचा चढता आलेख पाहता 2009 मध्‍ये गुजरात सरकार आणि राजन शाह यांनी आंतरराष्‍ट्रीय दर्जाची सायकल खरेदी करुन दिली.
पुजा ददरोज नियमित सहा तास ट्रायथलान स्‍पर्धांचा सराव करते. त्‍यांनतर एमएस्‍सीचा अभ्‍यास करते. शिवाय आपल्‍या भावंडांना कामात मदत करते. त्यांना प्रोत्‍साहित करते. आतापर्यंत तिच्‍या जीवनात अनेक चढ-उतार आले आहेत. कित्‍येक वेळेस ती जखमीसुध्‍दा झाली. परंतु तिने परिस्थितीसमोर माघार घेतली नाही. तर परिस्थितीचाच पराभव करून दाखविला. पुजाने आतापर्यंत 4 आंतरराष्‍ट्रीय, 28 राष्‍ट्रीय स्‍तरावरील पदकांसोबत 168 पदके जिंकली आहेत.
ही कथा पुजाचा भाऊ नील चौरसियाने शेअर केली आहे्. आपल्‍याकडे अशी कोणती गोष्‍ट असल्‍यास शेअर करण्‍यासाठी येथे क्लिक करा.