आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive Interview: मी पॉर्न स्टार नाही, तर एक अ‍ॅडल्ट अ‍ॅक्ट्रेस आहे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: पॉर्न स्टार शांती डायनामाइट सुरतमध्ये)

सुरत -
बॉलिवूडमध्ये एन्ट्रीमारण्याच्या आगोदरच प्रसिध्दीच्या झोतात आलेली पोर्न स्टार शांति डायनामाइट ही सध्या गुजरातच्या सुरत शहरात आहे. शांती गुजरातमध्ये तिचा आगामी चित्रपट ‘आय लव्ह दुबई’ च्या प्रमोशनसाठी आली आहे. या दरम्यान शांतीने आमच्या प्रतिनिधीशी बराच वेळ गप्पा मारल्या. मी पॉर्न स्टार नसून एक अ‍ॅडल्ट अ‍ॅक्ट्रेस असल्याचे तिने या मुलाखती दरम्यान सांगितले. या दरम्यान शांतीने तिच्या करिअर आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासंदर्भातील अनेक आठवणी आमच्यासोबत शेअर केल्या. शांतीचा जन्म युगांडामध्ये झाला आहे, मात्र तीचे कुटुंब गुजराती असल्याचेही तीने यावेळी सांगितले.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री का कराविशी वाटली या प्रश्नाचे उत्तर देताना शांती म्हणाली की, "मी एक पॉर्न स्टार आहे, मात्र आता मला माझी इमेज बदलायची आहे. त्यासाठीच मी बॉलिवूडमध्ये येण्याचे ठरवले. मी मागील दोन महिन्यांपासून इकराम अख्तर यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘आय लव्ह दुबई’ या चित्रपटात काम करत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातशिवाय मी भारताचे दुसरे कोणतेही राज्य पाहिले नाही. गुजरातला कलेची जाण आहे, गुजरातने आपली संस्कृती जोपासली आहे त्यामुळे मला गुजरात खुप आवडते."

पुढील स्लाईडमध्ये पाहा, शांती म्हणाली, मी पॉर्न स्टार नाही, तर मी एक अ‍ॅडल्ट अ‍ॅक्ट्रेस आहे