आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात: मुलगा पाहिजे म्हणून गर्भवतीला घरातून काढले, पार्किंगमध्ये मुक्काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित भाविका (नाव बदलले आहे) - फाइल फोटो - Divya Marathi
पीडित भाविका (नाव बदलले आहे) - फाइल फोटो
सुरत - येथील एका ९ महिन्यांच्या गरोदर असलेल्या महिलेला सासरच्या लोकांनी घराबाहेर काढले. मुलगा पाहिजे म्हणून तिचा छळही करण्यात येत होता. पीडितेने तक्रार करताच सासरची सगळी मंडळी आठवडाभरापूर्वीच पसार झाली. सध्या पीडिता पार्किंगमध्ये राहू लागली आहे.

पोलिस काहीही कारवाई करत नसल्याची महिलेची तक्रार आहे. सुरतच्या सिटीलाइट भागातील उत्तर गुजरात सोसायटीमध्ये राहणारे मितेश कोराट यांचा तीन वर्षांपूर्वी भाविका (नाव बदलले आहे) यांच्याशी विवाह झाला होता. मितेश यांचा हा पाचवा विवाह असल्याचे भाविका यांना उशिरा लक्षात आले. एकदा त्यांचा गर्भपातही करण्यात आला. दुसऱ्यांदा अपत्य त्यांच्या नणंदेला देण्याची चर्चा सुरू होती. भाविकाने पोलिसांत तक्रार केली.

त्यावेळी संपूर्ण कुटुंब फरार झाले. मितेशने अनेक महिलांचा छळ करून वारंवार विवाह केला आहे. त्याला कार-बंगला देण्याचे प्रलोभन देऊन संबंध तोडण्यास सांगितले जात असल्याचा भाविका यांनी आरोप केला आहे.
बातम्या आणखी आहेत...