आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DNA Testing Finds That Prince William Is 1 256th Indian And That Too Gujarati

ब्रिटनचा राजकुमार विल्यम्स आहे हाफ गुजराती, DNA तून सत्य उघडकीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत (गुजरात) - ब्रिटनचे राजकुमार विल्यम्स आणि त्‍यांच्‍या पत्‍नी केट मिडलटन भारत दौऱ्यावर आहेत. विल्यम्स हे इंग्‍लडचे असे पहिले राजपुत्र आहे की त्‍यांचे भारतासोबत नाते आहे. त्‍यांच्‍या पाचव्‍या पिढीतील आजी अर्ध्‍या भारतीय होत्‍या. याचा खुलासा जून 2015 मध्‍ये प्रिन्‍स विल्यम्स यांच्‍या एका नातेवाईकाच्‍या लार प्रशिक्षणातून झाला.
राजपुत्र विल्यम्स यांना आईच्‍या कुटुंबाकडून मिळाले भारतीय जीन...
डीएनए टेस्टनुसार प्रिन्‍स विल्‍मम्‍स यांचे नाते थेट भारताच्‍या गुजरातींशी आहे. त्‍यांना त्‍यांच्‍या आईच्‍या कुटुंबाकडून हे डीएनए मिळाल्‍याचे डीएनए विश्लेषणातून स्‍पष्‍ट झाले. अॅडिनबर्ग यूनिव्‍हर्सिटीचे जॅनेटिक स्पेशॅलिस्ट जिम विल्सन आणि ब्रिटनच्‍या 'डीएनए' नावाच्‍या एका संघटनेने प्रिन्‍स विल्‍यम्‍स यांच्‍या एका नातलगाचे लार परीक्षण केले होते. त्‍यातून ही बाब उघड झाली.
याच पिढीपर्यंत असेल भारताशी नाते, वाचा का...
जिम विल्सन यांनी सांगितले, भारतीयांमध्‍ये असणार विशेष असा मायटोकांड्रियल डीएनए हा राजपुत्र विल्‍यम्‍स यांच्‍या शरीरात आहे. तो केवळ आईकडूनच मुलाला मिळतो. पण, पुढे तो मुलगा वडील झाला तर त्‍याच्‍याकडून तो त्‍याच्‍या मुलामध्‍ये जात नाही. केवळ मुलीकडूनच तिच्‍या अपत्‍याच्‍या शरिरात तो जातो. त्‍यामुळेच राजघराण्‍याचे भारतासोबत असलेले नाते हे विल्‍यम्‍स आणि राजकुमार हॅरीपर्यंतच राहणार आहे.
विल्‍यम्‍स यांना आई डायकडून मिळाला डीएनए
परीक्षणानुसार, प्रिन्‍स विल्‍यम्‍स यांना हा डीएनए आपली आई प्रिन्‍सेस डायना यांच्‍याकडून मिळाला. प्रिन्‍सेस डायना यांच्‍या आजीची आजी एलिजा केवार्क (सन 1800 काळातील) सूरत येथील सौदागरवाडीमध्‍ये राहत होत्‍या. त्‍या अर्ध्‍या भारतीय होत्‍या. या काळात त्‍यांचे स्कॉटलँडचे बिजनेसमॅन थियोडोर फोर्ब्स यांच्‍यासोबत प्रेमकरण सुरू होते. या दोघांनी लग्‍न केले. त्‍यांना कॅथरीन स्कॉट नावाची मुलगी झाली. पुढे थियोडोर यांनी कॅथरीन सहा वर्षांची असताना तिला शिक्षणासाठी ब्रिटनला पाठवले. नंतर थियोडोर हे एलिजाला भारतात सोडून स्कॉटलँडला परत जात होते. पण, रस्‍त्‍यातच जहाजामध्‍ये (सन 1820) त्‍यांचा मृत्‍यू झाला. दरम्‍यान, त्‍यांनी आपल्‍या मृत्‍यूपत्रात एलिजा या आपली हाउसकीपर असल्‍याचे सांगितले होते.
एलिजांची मुलगी कॅथरीन यांच्‍या नंतरचा वंश
एलिजा यांची मुलगी कॅथरीन यांनी जेम्स क्राम्बी यांच्‍यासोबत लग्‍न केले. लग्‍नानंतर हे दोघेही गुजरातमधील सूरत शहरात आले होते. त्‍यांची मुलगी जेन हिने डेव्‍हीड लिटिलजानसोबत लग्‍न केले. जेन यांची मुलगी रूथ हिने विल्‍म्‍स गिलसोबत लग्‍न केले. रूथ यांची मुलगी फ्रांसिसी रूथ यांनी अर्ल आफ स्पेंसरसोबत लग्‍न केले. जे की प्रिंसेस डायना यांचे वडील होते. या मार्गाने एलिजाचा डीएनए प्रिंसेस डायनाच्‍या माध्‍यमातून ब्रिटनच्‍या शाही कुटुंबामध्‍ये पोहोचला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, केट आणि विल्यम्स यांची लव्‍ह स्‍टोरी... केट होत्‍या दुसऱ्याच्‍या प्रेमात... राजकुमाराने केले प्रपोज, केटने दिला होता नकार.... केट यांना कसे झाले विल्यम्स यांच्‍यावर प्रेम... कोण आहेत केट.... लग्‍नानंतर केटचे टॉपलेस फोटो प्रसिद्ध झाले होते...