बडोदा (गुजरात)- आत्मविश्वास वाढविण्याच्या नावाखाली 'परिश्रम क्लासेस'ने विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना चक्क अणकुचिदार काचांवरुन चालण्यास लावले अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. बडोद्यातील प्रतापनगर भागात हे क्लासेस आहेत.
क्लासच्या संचालकानेच व्हिडिओ केला जाहीर
- गेल्या रविवारी परिश्रम क्लासेसचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना काचांवरुन चालण्यास लावले. या क्लासेसचे संचालक राकेश पटेल यांनीच याचा व्हिडिओ स्थानिक न्युज चॅनेल्सना दिला. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
- याबाबत राकेश म्हणाले, की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा यासाठी अनेक शाळांमध्ये असे उपक्रम राबवले जातात. गुजरात बोर्डाची परिक्षा 8 मार्चपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आता हा प्रयोग घेण्यात आला.
पुढील स्लाईडवर बघा, अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो....