आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाकोर मंदिरावर विमानाने पुष्पवृष्टी, 859 वर्षांपूर्वी येथे आले होते द्वारकाधीश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाकोर - भक्त विजय सिंह बोडाणा यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन 859 वर्षांपूर्वी द्वारकेतून भगवान द्वारकाधीश बैलगाडीत बसून येथे आले होते. डाकोर यात्रा धाममध्ये द्वारकाधीश श्री रणछोडरायजी स्वरुपात विराजमान असून भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आज या मंदिरात भव्य भक्ती मनोरथ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या इतिहासात यावर्षी पहिल्यांदाच राजाधिराज श्री रणछोडरायजी यांच्यावर विमानाने पुष्पवृष्टी करण्यात आली.

डाकोर यात्रा धाममध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. मंदिरात सकाळी सात वाजता विष्णुयागाची स्थापना आणि संकृत वेदशाळेत 300 ब्राह्मणांद्वारे यज्ञ करण्यात आला. डाकोर स्टेशन जवळील दुधरेज धर्मशाळेपासून सकाळी 9 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये 4 हत्ती, 4 घोडे आणि 10 रथ सुशोभित करण्यात आले होते. दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण करताना मंदिरावर चार्टर प्लेनने पुष्पवृष्टी करण्यात आली.

पुष्पवृष्टी आणि शोभायात्रेचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(फोटो - जिग्नेश पटेल, डाकोर, दिव्य भास्कर)