आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Qutubuddin Ansari Gujarat Riots Narendra Modi Latest News

गुजरात दंगलीचा चेहरा बनलेल्या कुतुबुद्दीन यांनी मोदींचा दावा ठरविला फोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीतील पीडित कुतुबुद्दीन अंसारी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. कुतुबुद्दीन यांनी मोदींवर आरोप करीत म्हटले आहे, की गुजरातमधील मुस्लिम मोदी सरकारवर खूष नाहीत.
ते म्हणाले, मोदींच्या काळात गुजरातमधील मुस्लिमांचा थोडाही विकास झालेला नाही. कोलकत्यात काल (बुधवार) झालेल्या सभेत मोदींनी पश्चिम बंगालमधील मुस्लिमांपेक्षा गुजरात मधील मुस्लिम जास्त सुखी आणि आनंदी असल्याचा दावा केला होता. कुतुबुद्दीन यांनी मोदींचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
कोण आहे कुतुबुद्दीन अंसारी
कुतुबुद्दीन अंसारी गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीतील पीडित आहेत. दंगली दरम्यान त्यांचे हात जोडून विनवणी करणारे छायाचित्र जगभरात पसरले होते आणि तेच छायाचित्र गुजरात दंगलीची ओळख झाले होते.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कुठे राहातात कुतुबुद्दीन अंसारी