आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राफेल विमान खरेदीचा घोटाळा दडवला- राहुल; पंतप्रधान मोदी यांना विचारले 3 प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाहोड- राफेल विमान खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे.  नरेंद्र मोदी फ्रान्सला गेले तेव्हा त्यांनी राफेल विमानाचा करार परस्पर रद्द केला, त्यांना जनतेसमोर सत्य येऊ द्यायचे नाही, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.  मोदीजींना तीन प्रश्न विचारू इच्छितो, असे सांगून राहुल गांधी म्हणाले, फ्रान्सच्या एका कंपनीसोबत  राफेल विमान खरेदीच्या पहिल्या व दुसऱ्या करारादरम्यान विमानाच्या किमतीत फरक आहे. देशाला पहिल्या करारात जास्त पैसे व दुसऱ्या करारात कमी रक्कम द्यावी लागली होती काय? या  विमानाचे उत्पादन करण्यासाठी सार्वजनिक कंपनीला कंत्राट देण्याऐवजी त्यांनी  त्यांच्या एका  उद्योगपती मित्राला कंत्राट दिले का?  त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न हा करार रद्द झाला तेव्हा तत्कालीन संरक्षणमंत्री तेव्हा गोव्यात मासे पकडताना दिसले. या करारास मंत्रिमंडळाची मान्यता होती काय?  गांधीनगर जिल्ह्यातील जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. 


मोदीजी म्हणतात, ना बोलुंगा, ना बोलने दुंगा 
राहुल म्हणाले, मोदी फ्रान्सला गेले तर त्यांनी राफेल डील बदलून टाकली. तीही कोणालाही काहीही न विचारता. जी कंपनी विमाने तयार करण्यासाठी ओळखली जाते, तिच्याऐवजी मित्र असलेल्या उद्योगपतीला कॉन्ट्रॅक्ट दिला. त्यावेळी संरक्षण मंत्री गोव्यात होते. मोदींना माझ्या तीन प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत, म्हणून संसदच बंद केली. मोदीजी आता म्हणतात, ना बोलुंगा ना बोलने दुंगा. गुजरातच्या जनतेने सत्य ऐकूच नये असे त्यांना वाटते. 


जय शाह यांच्या कंपनीबाबत गुजरातला सांगा 
राहुल गांधी म्हणाले, राफेल डील एअरफोर्स, शहीद आणि नॅशनल सेक्युरिटीचा मुद्दा आहे. मोदीजींनी म्हटले होते की ते भ्रष्टाचार होऊ देणार नाहीत. जय शहाच्या कंपनीबाबत गुजरातच्या जनतेला सांगा. मोदीजी म्हणतात, दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देईल. मी विचारले किती तरुणांना रोजगार देता. मोदींचे मंत्री म्हणतात, भारतात 24 तासांत 450 तरुणांना रोजगार देतो. आमची सत्ता आली तर 33 हजार कोटी रुपये महिला आणि मुलांच्या शिक्षण तसेच आरोग्य आणि रोजगारासाठी देऊ. 5-10 उद्योगपतींचे सरकार चालणार नाही. 


गुजरातमध्ये जादूगार पाठवताहेत मोदी 
राहुल म्हणाले, मी ऐकले की, मोदी प्रचारासाठी गुजरातमध्ये जादूगर पाठवत आहेत. पेपरमध्ये आले की, प्रचारात खूप जादुगारांना गुजरातला पाठवले जात आहे. मी विचार केला, एक जादूगर तर आहे, मग इतरांची गरज काय. गुजरातला समजले आहे. गेल्या 22 वर्षांत काय दिले. फक्त आणि फक्त भाषण. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या जाहीर सभेचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...