आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी यांच्या कारवर हल्ला करणाऱ्याला अटक, अटकेतील युवक भाजपचा कार्यकर्ता : काँग्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी शनिवारी जयेश दारजी ऊर्फ अनिल राठोड यास अटक केली. बनासकांठा जिल्ह्यात पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना राहुल यांच्या कारवर दगड भिरकावण्यात आले होते. 
 
दरम्यान, अटक केलेला युवक भाजपच्या स्थानिक युवक संघटनेचा सदस्य असल्याचा आरोप काँग्रेसने केला. या युवकानेच दगड भिरकावल्याचे काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. त्याआधारे जयेश यास अटक केल्याचे पोलिस अधीक्षक नीरज बडगुजर यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांनुसार जयेश भाजप युवका मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस आहे. जयेशसह आणखी दोघांची नावे काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहेत. या दगडफेकीत एक पोलिस जवान जखमी झाला असल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
राज्यसभेच्या ८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत गुजरातमधून अहमद पटेल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. मात्र, शंकरसिंह वाघेला यांनी बंड करून काही आमदार फोडल्यामुळे पटेल अडचणीत येण्याची शक्यता आहे. 
 
काळे झेंडेही दाखवले
बनासकांठा जिल्ह्यातील लाल चौक भागात राहुल जाहीर सभेत बोलत असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. यानंतर राहुल भाषण आटाेपते घेत पुढील बैठकीसाठी रवाना झाले होते.
बातम्या आणखी आहेत...