Home »National »Gujarat» Rahul Gandhi Gujarat Visit News And Updates

आम्ही पंतप्रधानपदाचा अवमान करत नाहीत, पण विरोधी पक्षात असताना मोदी करायचे: राहुल

दिव्य मराठी वेब टीम | Nov 12, 2017, 12:52 PM IST

बनासकांठा (अहमदाबाद) - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरात दौऱ्याचा रविवार हा दुसरा दिवस आहे. येथे त्यांनी पक्षाच्या सोशल मीडिया आणि आयटी टीमची भेट घेतली. यादरम्यान ते म्हणाले की, आम्ही पंतप्रधानपदाचा अवमान करत नाहीत, परंतु मोदी विरोधी पक्षात असताना असे करायचे. राहुल रविवारी वादिनाथ मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत. राहुल यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात शनिवारी गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरातून केली होती. यानंतर ते अंबाजी मंदिरातही गेले होते. बनासकांठामध्ये राहुल गांधी तीन सभांना संबोधित करतील आणि संध्याकाळी पाटणाला जातील. दुसरीकडे, भाजपअध्यक्ष अमित शहाही येथे निवडणूक रॅली करतील.
सोशल मीडिया टीमला काय म्हटले राहुलने?
- राहुलने म्हटले, आम्ही आयडियाजवर लक्ष ठेवतो. यात 3-4 जणांची टीम असते, ते आम्हाला सल्ला देतात आणि योग्य चर्चेनंतर आम्ही ते ट्विट करतो. रुटीन काम, उदा. बर्थडे विशेस मी करत नाही, मी यावर काही इनपुट्स देतो. राजकीय मुद्दे माझेच असतात."
- आम्ही मोदींच्या चुका शोधू अथवा भाजपला डिस्टर्ब करू, आमचा उद्देश पंतप्रधानपदाचा अवमान करण्याचा नसतो. मोदी जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा नेहमी पंतप्रधानांचा अवमान करणारी वक्तव्ये करायचे. आमच्यात आणि त्यांच्यात हाच फरक आहे. मोदी आमच्याबाबत काय म्हणतात, याला महत्त्व नाही. परंतु आम्ही सत्य तेच बोलतो आणि सत्य हेच आहे की, गुजरातचा विकास पागल झाला आहे."

शनिवारी दोन मंदिरांत गेले होते राहुल...
- राहुल गांधींनी शनिवारी गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरात दर्शनासोबतच उत्तर गुजरातमध्ये 3 दिवसीय नवसृजन यात्रेचा चौथ टप्पा सुरू केला. ते अक्षरधाम मंदिरात 20 मिनिटे राहिले. येथे मंदिरात फिरण्यासोबतच पूजाअर्चा केली.
- संध्याकाळीही ते प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरात गेले. येथेही त्यांनी पूजा केली.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

Next Article

Recommended