आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या निवडणुकीत भाजपला करंट लागणार, भरुचच्या सभेत राहुल गांधींची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा - कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी तीन दिवसांच्चाय गुजरात दौऱ्यावर पोहोचले. नवसृजन यात्रेवर असलेले राहुल सर्वात आधी भरुचचा पोहोचले. याठिकाणी ते म्हणाले, येथे उद्योजकांचे सरकार आहे. सर्वकाही त्यांच्याच हाती आहे. येथे पैसा आहे तर सर्वकाही आहे. हे आहे, गुजरात मॉडेल. यानंतर राहुल गांधी तापी, वलसाड, नवसारी आणि सूरतला जातील. या दरम्यान ते नुक्कड सभा आणि रॅलींमध्येही सहभागी होतील. राहुल या दौऱ्यात शेतकरी आणि उद्योजकांशीही चर्चा करतील. गुजरातच्या निवडणुकीत भाजपला करंट लागणार असल्याची टीका त्यांनी याठिकाणी बोलताना केली. 
 
काय म्हणाले राहुल गांधी..
- भारतात इज ऑफ डुइंग बिझनेस नाही, नोटाबंजी आणि जीएसटीने सर्वांना उध्वस्त केले आहे.
- गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्याकडे सत्ता आहे, स्विस बँकेत अकाऊंट असणाऱ्या किती जणांना त्यांनी अटक केली.   
- मोदींनी तुरुंगात टाकले असेल असे एखाद्याचे तरी नाव सांगावे. विजय माल्या देशाबाहेरून गंमत पाहत आहे. 
- टाटा नॅनोसाठी नरेंद्र मोदींनी 33,000 कोटींचे बँक लोन दिले.
- 33,000 कोटींमध्ये गुजरातच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाऊ शकले असते. 
- तुमची जमीन घेतली आणि टाटा कंपनीला दिली. 
- तुम्ही नॅनो गाडी रस्त्यावर पाहिली आहे का, कुठे दिसते का ही गाडी. भारतात कुठेही दिसत नाही. 
- गुजरातमध्ये 90 टक्के कॉलेजेस मोठ्या व्यावसायिकांच्या हाती आहेत. गरीबांना त्याची फीस परवडणे शक्य नाही. 
 
 

नवसृजन यात्रेचता तिसरा टप्पा 
- राहुल गांधींची नवसृजन यात्रा सौराष्ट्रच्या द्वारकापासून सुरू झाली होती. दुसऱ्या टप्प्यात मध्य गुजरातमध्ये ती पोहोचली. तिसरा टप्पा दक्षिण गुजरातचा आहे. सध्याच्या काळात भाजपचा हा बालेकिल्ला असल्याचे समजले जाते. 
- या दौऱ्यात राहुल यांची भेट हार्दिक पटेलबरोबर होऊ शकते. हार्दिकने आधी राहुल गांधींच्याबाबत कठोर भूमिका अवलंबली होती. पण पाटीदार नेत्यांसी काँग्रेसच्या मिटींगनंतर त्याने नरमाईची भूमिका अवलंबली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...