आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाची विचारसरणी विष पेरणारी, मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल यांचा हल्लाबोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारडोली (सूरत) - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज गुजरातच्या दौ-यावर आहेत. प्रदेश काँग्रेसने काढलेल्या 'विकास खोजो' (विकास शोध) यात्रेत राहुल सहभागी झाले आहेत. यावेळी राहुल गांधींनी मोदींच्या बालेकिल्ल्यात येऊन त्यांच्यासह राष्ट्रीय स्वसंयसेवक संघाला लक्ष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनीच राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या केली असल्याची टीका केली.
सूरत जिल्ह्यातील बारडोली येथे विकास खोजो पदयात्रेत 5 किलोमीटरपर्यंत सहभागी झाल्यानंतर घेतलेल्या सभेत ते बोलत होते.
काय काय म्हणाले राहुल गांधी-
- चहा वाले, शेतकरी, मजूर यांचा सगळीकडे मान राखला जातो. मात्र जो मुर्ख बनवतो त्याचा कोणीही मान राखत नाही. (मोदींवर टीका)
- काँग्रेस गरीबी हटाव म्हणते तर हे लोक गरीबांनाच हटवा असे म्हणतात.
- आम्ही सर्वसामान्यांना शक्ती देऊ इच्छितो. येथे गुजरातमध्ये 5-6 लोक सरकार चालवतात.
- येथे गरीबांना वाली नाही, फक्त श्रीमंताना व उद्योगपतींची सुनावणी घेतली जाते.
- गुजरातमध्ये 38 लाख द्रारिद्री रेषेखाली आहेत, मग गुजरातचा विकास हा ढोल कशाला बडवायचा...
- गुजरातमधील 55 हजार छोटे उदयोग बंद झाले
- गुजरात विकास झाला असेल तर प्रत्येक गुजरातींच्या घामामुळे.. कोणा एकामुळे गुजरातचा विकास झालेला नाही
- गुजरातमध्ये गरीब आणि सामान्यांच्या हिताचे सरकार येणे गरजेचे आहे...
- आम्ही गरीबांना ताकद देऊ, त्यांना अधिकार देऊ व मध्यमवर्गीय आणू...
- आमच्या विचारधारेत महात्मा गांधी आणि सरदार पटेल आहेत...
- आरएसएसची विचारधारेनेच गांधींजीची हत्या झाली...
- आरएसएसची विचाधारा विष पेरणारी आहे...
- गुजरातमध्ये 13 हजार शाळा बंद केल्या, यावर कोणी का बोलत नाही...
- आम्ही अन्नसुरक्षा दिली, मनरेगा दिली, माहितीचा अधिकार दिला व आता लोकपालही येतोय...
- भाजपमधील लोकांना गुजरातमधील भ्रष्टाचार दिसत नाही...
- गुजरातचे सरकारने 9 वर्षापासून लोकायुक्त का बनविला नाही...
- हे लोक फक्त मूर्त्या, पुतळे, मंदिर बनविण्याची भाषा करतात...
- शेतक-यांचे आम्ही 70 हजार कोटी रूपये माफ केले...
- काँग्रेसने 14 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले...
पुढे वाचा, काय आहे गुजरातमधील 'विकास खोजो' यात्रा...