आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदीजी गुजरातमध्ये 50 लाख घरे बनवण्याचे आश्वासन 45 वर्षांनंतर पूर्ण करणार का : राहुल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी गुजरातच्या भाजप सरकारवर आश्वासन न पाळल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्वीट करत गुजरातच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यात लिहिले की, गुजरातच्या जनतेला तुमच्याकडून 22 वर्षांचा हिशेब हवा आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले की, तुम्ही 2012 मध्ये आश्वासन दिले होते की, 50 लाख नवी घरे देऊ. पण 5 वर्षांत फक्त 4.72 लाख घरेच बनवली. मग हे आश्वासन पूर्ण करायला आणखी 25 वर्षे लाहतील का? बुधवारी राहुल प्रचारासाठी सातव्यांदा गुजरातमध्ये येत आहेत. 


राहुल गांधींनी शनिवारी राफेल डीलबाबत विचारले तीन प्रश्न
पहिला प्रश्न - मोदीजी राफेल विमानांची किंमत तुम्ही का वाढवली?
दुसरा प्रश्न : एचएएलमधून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट हिसकावला आणि उद्योगपती मित्राला दिला, असे का?
तिसरा प्रश्न : कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीमधून परमिशन घेतली की नाही?


मोदीजी म्हणतात, ना बोलुंगा, ना बोलने दुंगा 
राहुल म्हणाले, मोदी फ्रान्सला गेले तर त्यांनी राफेल डील बदलून टाकली. तीही कोणालाही काहीही न विचारता. जी कंपनी विमाने तयार करण्यासाठी ओळखली जाते, तिच्याऐवजी मित्र असलेल्या उद्योगपतीला कॉन्ट्रॅक्ट दिला. त्यावेळी संरक्षण मंत्री गोव्यात होते. मोदींना माझ्या तीन प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत, म्हणून संसदच बंद केली. मोदीजी आता म्हणतात, ना बोलुंगा ना बोलने दुंगा. गुजरातच्या जनतेने सत्य ऐकूच नये असे त्यांना वाटते. 


जय शाह यांच्या कंपनीबाबत गुजरातला सांगा 
राहुल गांधी म्हणाले, राफेल डील एअरफोर्स, शहीद आणि नॅशनल सेक्युरिटीचा मुद्दा आहे. मोदीजींनी म्हटले होते की ते भ्रष्टाचार होऊ देणार नाहीत. जय शहाच्या कंपनीबाबत गुजरातच्या जनतेला सांगा. मोदीजी म्हणतात, दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देईल. मी विचारले किती तरुणांना रोजगार देता. मोदींचे मंत्री म्हणतात, भारतात 24 तासांत 450 तरुणांना रोजगार देतो. आमची सत्ता आली तर 33 हजार कोटी रुपये महिला आणि मुलांच्या शिक्षण तसेच आरोग्य आणि रोजगारासाठी देऊ. 5-10 उद्योगपतींचे सरकार चालणार नाही. 


गुजरातमध्ये जादूगार पाठवताहेत मोदी 
राहुल म्हणाले, मी ऐकले की, मोदी प्रचारासाठी गुजरातमध्ये जादूगर पाठवत आहेत. पेपरमध्ये आले की, प्रचारात खूप जादुगारांना गुजरातला पाठवले जात आहे. मी विचार केला, एक जादूगर तर आहे, मग इतरांची गरज काय. गुजरातला समजले आहे. गेल्या 22 वर्षांत काय दिले. फक्त आणि फक्त भाषण. 

 

 

बातम्या आणखी आहेत...