आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात : राहुल गांधींनी घेतले सोमनाथ मंदिरात दर्शन, दीड महिन्यात 21 व्या वेळी गेले मंदिरात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी बुधवारी सोमनाथ मंदिरात दर्शन घेतले. दीड महिन्यात राहुल गांधी 21 व्या वेळी मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत. थोड्याच वेळात ते सभाही घेणार आहेत. राहुल गांधी दोन दिवस (29 आणि 30 नोव्हेंबर) गुजरातच्या दौऱ्यावर असतील. गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी फक्त दहा दिवस उरले आहेत. पहिल्या टप्प्यात 9 तर 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 18 डिसेंबरला निकाल समोर येतील. 


भुजमध्ये दर्शन घेऊन केली होती प्रचाराची सुरुवात.. 
- राहुल गांधींनी आतापर्यंत 21 मंदिरांमध्ये दर्शन घेतले आहे. यापूर्वी त्यांनी गुजरातच्या सर्व प्रसिद्ध मंदिरांमध्ये पुजा केली आहे. 
- नरेंद्र मोदींनी भुजमध्ये आशापुरा देवीच्या मंदिरातून प्रचाराची सुरुवात केली होती. 
- राहुल गांधींनी द्वारकामध्ये दर्शन घेत नवसर्जन यात्रा सुरू केली होती. 
- राहुल गांधींनी द्वारकाधीश, कागवडमधील खोडलधाम, नाडियाडचे संतराम मंदिर, पावागड महाकाली, नवसारीतील ऊनाई माता मंदिर, अक्षरधाम मंदिर, बहुचराजी मंदिर, कबीर मंदिर, चोटिला देवी मंदिर, दासी जीवन मंदिर, राजकोटमधील जलाराम मंदिर, वलसाडचे कृष्णा मंदिर यासह लहान मोठ्या मंदिरांत राहुल गांधींनी दर्शन घेतले. 


मंदिरांवरून राजकीय वक्तव्ये... 
- नरेंद्र मोदी म्हणाले, आम्ही चांगल्या चांगल्या लोकांना मंदिरात जायची सवय लावली आहे. 
- राहुल म्हणाले, मी शिवभक्त आहे आणि सत्यावर माझा विश्वास आहे. 

 

मंदिरांच्या मतदारसंघांत कोणी मिळवला विजय

 

मंदिर मतदारसंघ 2012 2007 2002 1998
चोटिला चोटिला बीजेपी काँग्रेस इतर इतर
द्वारका द्वारका बीजेपी बीजेपी काँग्रेस काँग्रेस
सोमनाथ सोमनाथ काँग्रेस बीजेपी काँग्रेस काँग्रेस
डाकोर नडियाड बीजेपी काँग्रेस काँग्रेस काँग्रेस
अंबाजी दांता काँग्रेस काँग्रेस काँग्रेस काँग्रेस
पावागड हालोल बीजेपी बीजेपी बीजेपी बीजेपी
पालिताणा पालिताणा काँग्रेस बीजेपी बीजेपी बीजेपी
गिरणार जुनागड बीजेपी बीजेपी बीजेपी बीजेपी

 

 

 

बातम्या आणखी आहेत...