आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारच्या नोटबंदीने छोट्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले, रोजगार सर्वात मोठा प्रश्न - राहुल गांधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधींनी सोमवारी गुजरात विधानसभा प्रचाराची सुरुवात केली. - Divya Marathi
राहुल गांधींनी सोमवारी गुजरात विधानसभा प्रचाराची सुरुवात केली.
अहमदाबाद - नोटबंदीने मध्यम आणि छोट्या कारागिरांना निकामी केले आहे. लहान शेतकऱ्यांवरही हे आक्रमण होते. त्यांच्या दमनाचा हा प्रयत्न होता. छोट्या व्यापाऱ्यांना याचा सर्वात जास्त फटका बसला, लाखो लोकांचा नोटबंदी दरम्यान रोजगार गेला आहे. देशाचा जीडीपी घसरला, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराची राहुल यांनी सोमवारी येथून सुरुवात केली आहे. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. 
 
आणखी कोणते आरोप केले.. 
राहुल गांधी म्हणाले, 'जीएसटी ही काँग्रेसची संकल्पना होती. मात्र एनडीएने आणलेले जीएसटी हे काँग्रेसच्या जीएसटीपेक्षा फार वेगळे आहे. छोट्या व्यापाऱ्यांकडे 15-20 अकाऊंटंट राहात नाही. त्यांना सरळ टॅक्स पाहिजे होता. त्यासाठी आम्ही देशातील विविध टॅक्स ऐवजी जीएसटीची कल्पना मांडली होती. हा टॅक्सही फक्त 18 टक्के राहावा असे आमचे मत होते, सरकारने तो 28 टक्क्यांपर्यंत नेला आहे. आमची कल्पना हळुहळु हे लागू करण्याची होती, सरकारने फक्त ड्रामा केला. रात्री 12 वाजता. यामुळे गुजरातच्या छोट्या व्यापाऱ्यांना झटका बसला आहे. मोदी स्वच्छता आणि गंगेबद्दल बोलत असताता, मात्र देशात सर्वात मोठा प्रश्न आहे रोजगाराचा.'
 
कुठे आहे मेक इन इंडिया 
- भारतात कपड्यापासून बुटांपर्यंत सर्वकाही चीनमधून आयात होत आहे, अशा परिस्थितीत आपण चीनशी स्पर्धा कशी करणार, असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. ते म्हणाले, 'देशासमोर खरा प्रश्न आहे कोट्यवधी युवकांना रोजगार देण्याचा. आपली स्पर्धा कोणासोबत आहे. कपड्यांपासून बुटांपर्यंत सर्वकाही मेड इन चीन आहे. आता जग सवाल करत आहे भारत चीनसोबत स्पर्धा कशी करणार. तिथे लोकशाही नसून लष्कर आहे. लोक दहशतीखाली काम करतात. त्यांचा सामना भारतातील छोटे व्यापारी कसा करतील.'
 
मोदींनी 60 हजार कोटी एका कंपनीला दिले
- राहुल गांधींनी यावेळी मोदींवर अनेक गंभीर आरोप केले. मोदी देशातील फक्त 50 कुटुंबांना फायदा मिळवून देत आहेत. 
- राहुल गांधी म्हणाले, 'मोदींनी एका कंपनीला 60 हजार कोटी रुपये कर्ज दिले आहे. जर हीच रक्कम गुजरातमधील छोट्या व्यापाऱ्यांना दिली असती तर किती फायदा झाला असता? गुजरातची शक्ती ओळखली पाहिजे, मात्र सरकार छोट्या व्यापाऱ्यांच्या हिताचे काम करत नाही. आम्ही पाहात आहोत की टेक्सटाइल्स इंडस्ट्री बांगलादेशात जात आहे.'
 
काँग्रेसचे 125 प्लसचे लक्ष 
- काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत 125 प्लसचे टार्गेट निश्चित केले आहे. त्या दिशेने काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. राज्यसभेत मिळालेल्या एका जागेमुळे काँग्रेसचे मनोबल वाढले आहे. 
- निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी निवडणुकीआधी 8 वेळा येणार आहे. 22 सप्टेंबर रोजी ते देवभूमि द्वारका येथून दौरा सुरु करणार आहेत. 
- या दौऱ्या दरम्यान चार वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यक्रमांनाही ते हजेरी लावतील. यात भाजपवर नाराज पाटीदार, ओबीसी आणि दलित समाजाला काँग्रेससोबत जोडण्याचा त्यांचा प्रयत्न राहाणार आहे. 
- गुजरात विधानसभेत एकूण 180 जागा आहेत. 
बातम्या आणखी आहेत...