आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: लहान आहे गुजरातचे राजभवन, पण एखाद्या महालापेक्षा कमी नाही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गांधीनगर येथील राजभवन)
गांधीनगर - केंद्रातील मोदी सरकारने दहा राज्यांमधील काँग्रेसच्या राज्यपालांकडे राजीनाम्याची मागणी केल्याची बातमी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. त्यामुळेच की काय गुजरातच्या राज्यपाल कमला बेनीवाल यांच्या नावाचीही चर्चा सध्या जोर धरत आहे. कारण राज्याच्या 18 व्या राज्यपाल असलेल्या बेनीवाल यांच्या राज्यपालपदाचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये पुर्ण होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी मोदी आणि बेनीवाल यांच्यामध्ये नेहमीच 36 चा अकडा होता. यामध्ये सर्वात मोठा वाद हा गुजरात्या लोकायुक्ताच्या नियुक्तीवरून झाला होता. यामुळे बराच काळ चाललेल्या राजकीय युध्दात मोदी सरकारला यश मिळाले होते. फक्त लोकायुक्तच नाही तर अशी डझनभर प्रकरणे आहेत जेव्हा मोदी आणि बेनीवाल आमने-सामने आले होते. यामुळेच मोदींच्या मुख्यमंत्री कार्यकाळात गुजरातचे गांधीनगर येथील राजभवन नेहमीच चर्चेत असायचे. याच राजभवनाच्या काही वैशिष्ट्यांबद्दल आज आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत.

राजभवनाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हे राजभवन जवळपास 25 हजार स्क्वेअरफुट क्षेत्रफळावर पसरले आहे. गुजरातचे हे राजभवन देशातील इतर राज्यांच्या राजभवनाच्या तुलनेत फारच छोटे आहे. देशातील सर्वात मोठे राजभवन पश्चिम बंगालची राजधानी कोलकता येथे आहे, ज्याचे क्षेत्रफळ 84 हजार स्क्वेअरफुट आहे. त्याचबरोबर गुजरातचे हे राजभवन राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर विदेशी नेत्यांच्या थांबण्यासाठी फारच लहान आहे. मात्र, या राजभवनाची सजावट काही अशा प्रकारे करण्यात आली आहे, की जणू हे एखादा महालच भासवा. गुजरातच्या राजभवनाच्या वेबसाईटवर नुकतेच याची काही अंतर्गत छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली आहेत.

पुढील स्लाईडवर पहा... राजभवनाविषयीची काही मजेदार माहिती छायाचित्रांसहित (सर्व छायाचित्रे राजभवनाच्या वेबसाईटवरून घेण्यात आली आहेत)