आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकोटमध्ये डॉन दाऊदचे चार शार्प शूटर अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट (गुजरात)  - गुजरातेत पोलिसांनी ४ शार्प शूटर्सना पकडून  जामनगरमधील शिपिंग व्यवसायात दहशत निर्माण करण्याचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे मनसुबे उधळून लावले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजकोट पोलिसांनी शनिवारी दुपारी या शार्प शूटर्सना कुकवाडाजवळ अटक केली. ते एका लक्झरी बसमधून प्रवास करत होते. त्यांची ओळख रामदास रहाणे, अनिल राजूभाई, संदीप दयानंद आणि विनीत पुंडिक अशी झाली असून त्यांच्याकडील ९ एमएमचे एक पिस्तूल, सहा काडतुसे आणि दोन चाकू जप्त करण्यात आले. 
 
महाराष्ट्रातील एका खासगी लक्झरी बसमधून प्रवास करत ते गुजरातेत पोहोचले होते. राजकोटमार्गे ते जामनगरला पोहोचणार होते.  तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडले. संध्याकाळी जामनगर येथून एका शिपिंग व्यापाऱ्यास राजकोटला आणण्यात आले होते.  
 
राजकोट पोलिसांना मिळालेली माहिती अशी की, डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याचे ४ शार्प शूटर्स (नीता ट्रॅव्हल्स, बस क्रमांक जीजे ३ बीव्ही ४४००)मधून जामनगरला जात आहेत. यावर पोलिसांची ४ पथके बनवण्यात आली. एक पथक चोटीला येथून बसमध्ये बसले.
बसच्या प्रवाशांवर ते लक्ष ठेवून होते. राजकोटपासून ही बस फार तर २० किमी दूर अहमदाबादच्या दिशेने कुकवाडाला गेली असेल. 
 
तेथे बुलेटप्रूफ जॅकेटसह सज्ज उच्चाधिकाऱ्यांच्या पथकाने बसला थांबण्याचा इशारा केला आणि बसला चोहोबाजूंनी घेरले. रामदास रहाणे, अनिल राजूभाई, संदीप दयानंद आणि विनीत पुंडिक यांना पकडले. त्यांच्याकडील सामानाची झडती घेतली असता एक पिस्तूल, दाेन चाकू, सहा  जिंवत काडतुसे  सापडली.  दाऊद इब्राहिमचा विश्वासू मानल्या जाणाऱ्या रामदास रहाणे याने एका शिपिंग व्यापाऱ्याची सुपारी घेतल्याचे मान्य केले. 
 
अनिसने दिली होती सुपारी   
शिपिंग व्यावसायिक अशफाक खत्री यांच्या हत्येची सुपारी दाऊदचा भाऊ अनिस याने घेतली होती. शार्प शूटर्सना १० लाखांत हे काम करण्याची जबाबदारी दिली होती. रामदास रहाणे अनिस इब्राहिमचा खास माणूस म्हणून ओळखला जातो. त्याने पोलिसाना सांगितले, अनिसने १० लाखांत ही सुपारी देऊन जामनगरचा शिपिंग व्यावसायिक अशफाक खत्री याची हत्या करण्याचे काम दिले होते. यासाठी आम्ही जामनगरला जात होतो.
 
जामनगरात शिपिंग व्यवसायाची सगळी माहिती घेतली होती. रेकीही केली होती. आता या काँट्रॅक्ट किलिंगचे काम फत्ते करायचे होते. शॉर्प शूटरच्या कबुलीजबाबानुसार पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...