आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकोटमध्ये 'स्टोन किलर' ची दहशत वाढली, दगडाने ठेचून तिघांची हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - गुजरातमध्ये राजकोट शहरात गेल्या काही दिवसांत दगडाने ठेचून तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. या खुनाचे गूढ अद्याप उकलले नसून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लोक रात्र - रात्र जागून स्वत:च पहारा देत आहेत. नागरिकांच्या मनात स्टोन किलरची इतकी दहशत बसली आहे की लोक त्याच्यासारख्या दिसणाऱ्या वा कुणाही संशयित व्यक्तीवर हल्ले करत आहेत.

राजकोट पोलिसांना अद्याप याबाबत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे खुन्याचा शोध घेण्यासाठी अहमदाबाद गुन्हे शाखेची मदत घेण्यात येत आहे. तथापि, त्यांनी काही सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याआधी आरोपीचे रेखाचित्र जारी केले आहे. सोशल मीडियातही आरोपीचे स्केच व्हायरल झाले आहे. त्याआधारे लोक संशयिताला बदडत आहेत. गुरुवारी रात्री उशिरा शहरातील माधापूर चार रस्ता भागात स्टोन किलर दिसल्याची अफवा पसरली. लोकांचा मोठा जमाव जमला. त्यांनी स्टोन किलरसारख्या दिसणाऱ्या एक डोक्यावर परिणाम झालेल्या व्यक्तीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. मारहाण होत असताना तो विनवणी करत होता. परंतु गर्दीतील कुणीही त्याचे ऐकले नाही. पोलिस आल्यावर त्यांनीच शेवटी तरुणाची सुटका करून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शहरात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या भागांत दगडाने ठेचून तीन जणांची हत्या झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...