आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajya Sabha Elections: Shankarsinh Vaghela Did Not For Ahmed Patel, Congress Will Not Win

गुजरात राज्यसभा निवडणूक \'ड्रामा\': BJP-CONG आमने-सामने, मतदानाचा वाद पोहोचला EC पर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर- गुजरातमध्ये आज (मंगळवारी) राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान झाले. मात्र, भाजप- काँग्रेस अामनेसामने आले आहेत. काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपला मतदान केले आणि मतपत्रिका सार्वजनिक केली. यावर आक्षेप घेत काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. 'त्या' दोन आमदारांचे मते बाद करण्‍याची मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांनी सांगितले की, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना व्हिडिओ पाहाण्याची विनंती केली. त्यात दोन आमदार आपले मत सार्वजनिक करताना दिसत आहे. मात्र, त्याला भाजपने विरोध दर्शवला आहे.
 
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी भाजपकडून अमित शहा, स्मृती ईराणी आणि बलवंत सिंह राजपूत तर काॅंग्रेसकडून सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 176 आमदारांनी मतदान केले. त्यात काँग्रेसच्या 7 तर राष्‍ट्रवादीच्या एक आमदाराने क्रॉस व्होटिंग केले. अहमद पटेल यांनी ही निवडणूक लढायला नको होती, उगीच प्रतिष्ठा पणाला लावली, अशी टीका राष्ट्रवादी नेते माजिद मेमन यांनी केली आहे.


क्रॉस व्हो‍टिंग करणारा एक आमदार काँग्रेसच्या त्या 44 आमदारांमधील आहे. या सगळ्या आमदारांना काँग्रेसने बंगळुरूला सहलीसाठी पाठवले होते. काँग्रेसचे बंडखोर नेते शंकरसिंह वाघेला यांनी अहमद पटेल यांना मत दिले नसल्याचे सांगितले. त्यामुळे पटेल यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

भाजपने बलवंत सिंह यांना राज्यसभेची उमेदवारी दिली त्यांनी नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. अशात राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची भीती काँग्रेसला आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाने आपल्या 44 आमदारांना बंगळुरूला पाठवले होते. ते सगळेच निवडणुकीसाठी परतले आहेत. त्यातही 4 ते 5 काँग्रेस आमदारांनी पटेलांना मत दिले नाही, असा गौप्यस्फोट शंकरसिंह वाघेला यांनी केला होता.

निवडणूक आयोगापर्यंत कसा पोहोचला वाद?
- काँग्रेसने आरोप केला आहे की, शंकरसिंह वाघेला यांच्या गटातील दोन आमदार राघवजी पटेल आणि भोलाभाई गोहिल यांनी भाजपला मतदान केले. तसेच आपली मतपत्रिका भाजप एजंटला दाखवली. यावर काँग्रेसचे शक्ति सिंह गोहिल यांनी आक्षेप घेत दोन्ही आमदारांचे मते बाद करण्‍याची मागणी केली.
- यामुळे सुरु झालेली मतमोजणी थांबवण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसची मागणी फेटळली.
- न्यूज एजन्सी एएनआयनुसार, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि आरपीएन सिंह यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍याची भेट घेतली. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची मते बाद करण्‍याची मागणी केली. नंतर सुरजेवाला यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अमित शहा यांच्या उपस्‍थितीतच ही 'हेराफेरी' झाल्याची घणाघाती टीका केली आहे.  
-आरपीएन सिंह यांनी निवडणूक प्रक्रिया थांबवून केंद्रीय निवडणूक आयोगाने व्हिडिओ फुटेज पाहावे, अशी विनंती केली. आता त्यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपनेही घेतली निवडणूक आरोगाकडे धाव...
- वाद वाढल्यानंतर भाजपनेही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. भाजपच्या शिष्टमंडळात अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, एमए नकवी, निर्मला सीतारमण, पीयूष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे.
- रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, काँग्रेसने ज्या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे, ते सकाळीच टाकण्यात आले होते. मते टाकण्यात आली तेव्हा काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला नाही. मतमोजणी सुरु झाल्यानंतर पराभवाच्या भीतीने वाद उकरुन काढला आहे.
- निवडणूक आयोगाने मतमोजणी तत्काळ सुरु करण्‍याचा निर्णय द्यावा, अशी मागणीही प्रसाद यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...